Monday, May 27, 2024

श्रीक्षेत्र मढी येथे भटक्या जाती-जमात परिषदेचे आयोजन

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

अखिल भटका जोशी समाज सेवा संघाचे वतीने श्रीक्षेत्र मढी येथे भटक्या जाती-जमातीच्या ऐतिहासीक परिषदेचे आयोजन करण्यात असल्याची माहिती सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव मापरे (भेंडा) यांनी दिली.

भटक्यांची पंढरी म्हणून ओळखल्या जाणारया श्रीक्षेत्र मढी येथे शनिवार दि.६ एप्रिल रोजी सकाळी ११:३० वाजता भारत सरकारच्या निती आयोग उपसमितीचे सदस्य पद्मश्री. कर्मवीर दादासाहेब इदाते यांचे अध्यक्षतेखाली होत असलेल्या भटक्या जाती-जमातीच्या परिषदेचे १८ वे वर्षे आहे. सेवा संघाचे संस्थापक अध्यक्ष वामनराव मापरे,राज्याचे अध्यक्ष समाधान गुऱ्हाळकर यांचे हस्ते परिषदेचे उदघाटन होणार आहे.तर किशोर शास्त्री जोशी हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.
या परिषेदेमध्ये भटक्या जाती जमातीचे समुहाचं एक संघटन करण्यामागील उद्दिष्ट व भुमिका स्पष्ट करणे, सामाजीक, राजयकिय व शैक्षणिक विषयावर चर्चा करणे, भटक्या जमातिला राजकिय आरक्षण तसेच स्वतंत्र जातनिहाय जनगणना करणे, उत्कृष्ट काम करणाऱ्या व्यक्तींचा मानपत्र देऊन सत्कार करणे,
आदी विषयावर चर्चा होणार आहे.

याऐतिहासिक परिषेदेस जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन
सेवा संघाचे राज्य कार्याध्यक्ष सोपान महापुर,नगर जिल्हाध्यक्ष राजेंद्र जोशी,राज्य युवक अध्यक्ष रविंद्र गंगावणे,
युवक जिल्हाध्याक्ष बाबासाहेब वाघडकर,
नेवासा तालुका सचिव बाबासाहेब महापूर, संतोष इंगळे,संजय फुलमाळी,बाबा महाराज मोरे, शिवाजी पोटे, राज गोत्राळ,अशोक साळवे, दादासाहेब गजरे, डॉ. दिलीप यादव,अंबादास गोंडे,रामचंद्र गंगावणे,अंबादास अटक,दादासाहेब गोत्राल, सुनिल वाकडे, बंडु गागरे, रविंद्र गंगावणे, धोंडीराम भिसे,नवनाथ मोरे, श्री. संतोष गदाई, नवसुराम एकनार, भारत साळवे, भाऊसाहेब गदाई, चंद्रकांत महापुर,ज्ञानेश्वर गदाई,भाऊसाहेब सुपेकर, बाजीराव महापुर, अंसराम एकनार ,पोपट वाघडकर, बाबासाहेब गोंडे,वसंत महापूर, ताराचंद साळवे, संजय भोसले, रघुनाथ मोहरकर,अविनाश वाडकर,संजय गजरे, राजेंद्र मापारे, गणेश महाराज वायकर, बाळासाहेब वाघडकर, दिलीप गदाई आदींनी केले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!