माय महाराष्ट्र न्यूज:नगर दक्षिण मतदारसंघात नवा ट्विस्ट निर्माण झाला आहे. या मतदारसंघातून भाजपने विद्यमान खासदार सुजय विखे पाटील यांना उमेदवारी जाहीर केली आहे.
तर महाविकास आघाडीकडून सध्याचे अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके हे निवडणुकीच्या रिंगणात उतरतील अशी शक्यता वर्तवली जात होती.काही दिवसांपूर्वी आमदार निलेश लंके
यांनी शरद पवार यांची भेट घेऊन चर्चाही केली. मात्र निलेश लंके यांचे नाव लोकसभेसाठी जाहीर न झाल्याने आता चर्चा वाढू लागली आहे.आता समोर आलेल्या माहितीनुसार, निलेश लंके आपल्या
पत्नी राणीताई लंके यांना याठिकाणी लोकसभेची उमेदवारी मिळावी यासाठी आग्रही असल्याची माहिती समोर येत आहे.पक्ष बदलाच्या तांत्रिक अडचणीमुळे आमदार निलेश लंके निवडणुकीपासून
दूर राहण्याच्या प्रयत्नात असल्याची माहिती खात्रिलायक सूत्रांकडून मिळत आहे. मात्र यामुळे महाविकास आघाडीत उमेदवारीचा पेच वाढला आहे. तर निलेश लंके यांनाच उमेदवारी देण्यावर शरद पवार ठाम आहेत.
निलेश लंके हे आपल्या पत्नी राणीताई लंके यांच्या उमेदवारीसाठी आग्रही आहेत. आमदार निलेश लंके यांच्या पत्नी राणीताई लंके या माजी जिल्हा परिषद सदस्य आहेत. लोकसभा निवडणुकीत
खासदार सुजय विखे पाटील यांच्याविरुद्ध आमदार निलेश लंके की त्यांच्या पत्नी राणीताई लंके उभ्या राहणार याबाबत अद्यापही प्रश्नचिन्ह आहे. मात्र शरद पवार आमदार निलेश लंके यांच्या उमेदवारासाठी
आग्रही आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या या उमेदवाराचा पेच कसा आणि कधी सुटणार याकडेच सर्वांचे लक्ष लागून आहे.