Thursday, November 21, 2024

अहमदनगर ब्रेकींग: ठाकरे गटाला मोठा धक्का; या बेड्या नेत्याचा शिंदे गटात प्रवेश

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीवरून राज्यातील राजकीय वातावरण तापलं असताना शिर्डीत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. अहमदनगर जिल्ह्यातील

श्रीरामपूरचे माजी आमदार भाऊसाहेब कांबळे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत गुरुवारी (ता. २१) रात्री उशीरा मुंबईत हा प्रवेश सोहळा पार पडला.

भाऊसाहेब कांबळे यांनी २०१९ मध्ये काँग्रेस पक्षाकडून लोकसभेची निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर कांबळे यांनी शिवसेनेत प्रवेश करत

श्रीरामपूर विधानसभेचं तिकीट मिळवलं होतं. मात्र, विधानसभा निवडणुकीतही त्यांना पराभवाचा सामना करावा लागला होता.आगामी लोकसभा निवडणुकीत (Lok Sabha Election 2024) ठाकरे गटाकडून

आपल्याला उमेदवारी मिळेल, अशी आशा भाऊसाहेब कांबळे यांना होती. मात्र, उद्धव ठाकरे यांनी भाऊसाहेब वाकचौरे यांना पुन्हा पक्षात दिल्याने कांबळे नाराज झाले होते. ते लवकरच शिंदे गटात प्रवेश करतील

अशी चर्चा काही दिवसांपासून सुरू होती.गुरुवारी कांबळे यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह थेट मुंबई गाठत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. यानंतर अधिकृतपणे त्यांनी शिंदे यांच्या

शिवसेनेत प्रवेश केला. ऐन लोकसभा निवडणूक तोंडावर असताना माजी आमदाराने शिंदे गटात प्रवेश केल्याने शिर्डीत ठाकरे गटाचं टेन्शन वाढलं आहे.शिर्डी लोकसभा मतदारसंघ सध्या शिवसेनेच्या ताब्यात

असून याठिकाणी शिंदे गटाचे सदाशिव लोखंडे हे खासदार आहेत. मात्र, यंदाच्या निवडणुकीत त्यांना तिकीट मिळणार की नाही? याबाबत अजूनही संभ्रम आहे. कारण भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केला आहे.

शिर्डी लोकसभेसाठी महायुतीकडून केंद्रीयमंत्री रामदास आठवले इच्छुक आहेत. तर भाजपचे नितीन उदमले यांनी देखील पक्षाकडे उमेदवारी मागितली आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीकडून

माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे, काँग्रेस पक्षाच्या उत्कर्षा रूपवते, राजेंद्र वाघमारे निवडणूक लढवण्यास इच्छुक आहेत. त्यामुळे उमेदवारीची माळ कुणाच्या गळ्यात पडणार? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!