माय महाराष्ट्र न्यूज: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या सुट्ट्यांच्या यादीनुसार मार्च २०२४ मध्ये देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये
तब्बल १४ दिवस बँकांना सुट्ट्या असतात. यादरम्यान आता होळीचा सण सोमवारी आल्याने पुन्हा सलग तीन दिवस सुट्ट्या असणार आहेत.
रविवार यासोबतच दुसरा आणि चौथा शनिवार, सार्वजनिक सुट्ट्या आणि काही प्रादेशिक सुट्ट्यासंह या सगळ्या सुट्ट्या राज सरकारे आणि आरबीआय हे दोघे मिळून ठरवत असतात.
मार्च महिन्यात असलेल्या सुट्ट्यांबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या सुट्ट्यांच्या यादीमध्ये १४ दिवस बँका बंद आहेत.
यामध्ये वेगवेगळ्या सणांचा देकील समावेश आहे.दरम्यान होळी यंदा सोमवारी येत असल्याने अनेक राज्यांमध्ये शनिवार व रविवारची सुट्टी जोडून बँक कर्मचाऱ्यांना लाँग विकेडचा आनंद
घेता येणार आहे. कारण होळीच्या आधी रविवार आणि त्याआधी महिन्याचा चौथा शनिवार येत आहे.देशभरात मोठ्या थाटामाटात होळी साजरी केली जाते. होळीच्या काळात 22 मार्च ते 29 मार्च
दरम्यान अनेक राज्यांतील बँकांना सुट्टी असणार आहे. 25 मार्च रोजी देशात होळीचा सण साजरा केला जाणार आहे.याआधी दुसऱ्या शनिवार आणि रविवारी बँकेला सुट्टी असेल. बँकेच्या
सुट्ट्यांमुळे तुमचे काम अडकू शकते. अशास्थितीत तुम्ही ते आता पूर्ण करू शकता. पुढे आम्ही तुम्हाला या महिन्यातील बँक सुट्ट्यांची संपूर्ण यादी दिली आहोत.
जेणेकरून तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही. होळीच्या काळात सुमारे तीन दिवस बँकांना सुटी असेल.