माय महाराष्ट्र न्यूज:इंजिनिअरिंग, फार्मसी, नर्सिंग, एलएलबी अशा काही व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशांसाठी राज्याच्या सीईटी सेलकडून
घेतल्या जाणाऱ्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. यापैकी फार्मसीच्या प्रवेशांकरिता घेण्यात येणाऱ्या एमएचटी-सीईटीतील पीसीबी गटाची परीक्षा २२, २३, २४ २८, २९, ३०
एप्रिलला होणार आहे. याआधी ही परीक्षा १६ ते २३ एप्रिलदरम्यान होणार होती. तर इंजिनिअरिंगच्या प्रवेशाकरिता घेतली जाणारी पीसीएम गटाची परीक्षा २, ३, ४, ५, ९, १०, ११, १५, १६ मे अशी होणार आहे.
ही परीक्षा २५ ते ३० एप्रिलदरम्यान होणार होती. इतरही अभ्यासक्रमांच्या सीईटीच्या तारखांमध्ये बदल करण्यात आले आहेत. एमएएच=एएसी ही राज्यातील अप्लाइड आर्ट्स ॲण्ड क्राफ्ट्सकरिता
घेतली जाणारी परीक्षा १२ मे रोजी होणार आहे. एमएएच-पीजीपी सीईटीची सुधारित तारीख काही काळाने घोषित करण्यात येईल.
सुधारित तारखा
एमएएच-बीए, बीएससी, बीएड (चार वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) – १७ मे
एमएएच-एलएल.बी. (पाच वर्षांचा इंटिग्रेटेड कोर्स) – १७ मे
एमएच-नर्सिंग – १८ मे
एमएएच-बीएचएमसीटी – २२ मे
एमएएच-बी.बीसीए, बीबीए, बीएमएस,बीबीएम – २७ ते २९ मे