Saturday, December 21, 2024

सुजयच्या नावातच जय, त्यामुळे सुजयचा विजय श्रीकांत शिंदेंचे विखेबद्दल सर्वात मोठे विधान

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:गेल्या 10 वर्षात पंतप्रधान मोदींच्या कामामुळे आपल्या देशाकडे पाहण्याचा दृष्टीकोण बदलला आहे. लोकसभेची

निवडणूक ही कोणत्या एका व्यक्तीची नाही ही निवडणूक देशाची निवडणूक आहे. सुजयच्या नावातच जय आहे त्यामुळे सुजयचा विजय निश्चित आहे, असे वक्तव्य खासदार श्रीकांत शिंदे यांनी केले आहे.

शिवसेना शिंदे गटाच्या मेळाव्यात ते बोलत होते.श्रीकांत शिंदे म्हणाले की, कोविडच्या नावाखाली हिंदू सणांवर बंदी घालण्याचे काम करण्यात आलं होतं. ज्या शिवतीर्थवर हिंदुहृदयसम्राट

हिंदुत्ववाचे विचार मांडायचे त्याच शिवतीर्थवर काँग्रेसची यात्रा आली. सावकारांना शिव्या घालणाऱ्यांसोबत ‘ते’ गेले, असा टोला त्यांनी यावेळी उद्धव ठाकरेंना लगावला आहे. सुजय विखेंनी 10 हजार कोटींची

काम या जिल्ह्यात केली. रिक्षा चालवणारा व्यक्ती राज्याचा मुख्यमंत्री झाला. देशात 400 पारचा आकडा पार पाडायचा असेल तर सर्वांनी मतभेद बाजूला ठेवावे, असेही त्यांनी म्हटले आहे.यावेळी सुजय विखे पाटील

म्हणाले की, नगरची लोकसभा निवडणूक ही विचारांची निवडणूक आहे. भाजपचा उमेदवार मी तर फिक्स आहे, समोरचा उमेदवार अजून ठरेना. जिल्ह्यातील नागरिकांनी विखे कुटुंबातील चौथ्या पीडिला

सत्तेत बसवलं, आमचं काहीतरी योगदान असेल म्हणून तर नागरिकांनी आम्हाला साथ दिली आहे. एखाद्या व्यक्तीला माझ्याबद्दल द्वेष असेल तर हरकत नाही, पण ही निवडणूक महायुतीची निवडणूक आहे. महायुतीची निवडणूक आहे असं समजून

सर्वांनी एकजुटीने राहावं. एक सरपंच फोडायचा असेल तर सहा-सहा महिने घालवावी लागतात इथे एकनाथ शिंदेंमागे 40-40 आमदार जातात. काहीतरी विचार असेल म्हणून तर आमदार एकनाथ शिंदेंसोबत गेले असतील, असेही त्यांनी म्हटले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!