Saturday, April 27, 2024

भाजप जिल्हाध्यक्षाच्या घरासमोर आपचे बोंबाबोंब आंदोलन

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

आम आदमी पक्षाचे संयोजक व दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या जिल्हा संघटनेच्या वतीने भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे यांच्या शिरसगाव येथील निवासस्थानी आज रविवार दि.२४ मार्च रोजी बोंब मारो आंदोलन केले.तर केजारीवाल यांना अटक हा भाजपाचा नसून तो कोर्टाचा निर्णय असल्याचे भाजपा उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे यांनी सांगितले.

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना इंडिकडून अटक केल्यानंतर जिल्हाभारत आपच्या वतीने ठिकठिकाणी निषेध व्यक्त करून आंदोलन सुरु आहेत.
आज सकाळी १२ वाजेच्या सुमारास होळी सणाच्या पार्शवभूमीवर आप ने हे बोंबा बोंब आंदोलन केले. या वेळी भाजप सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत निषेध व्यक्त केला.
यावेळी आपचे जिल्हा अध्यक्ष राजू आघाव अहमदनगर शहर जिल्हा अध्यक्ष भरत खाकाळ, भैरवनाथ भारस्कर, जिल्हा संघटक सुभाष केकाण ॲड. सादिक शिलेदार, सोमनाथ कचरे प्रवीण तिरोडकर, शेवगांवचे दादासाहेब बोडखे, पाथर्डी तालुकाध्यक्ष राम लाड,बाबासाहेब वडगे, करीमभाई सय्यद, विठ्ठल मैनदाड उपस्थित होते.

*केजारीवाल यांना अटक हा भाजपाचा नसून तो कोर्टाचा निर्णय-लंघे

प्रतिक्रिया देताना  भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष विठ्ठल लंघे म्हणाले की, आपच्या कार्यकर्त्यांनी माझ्या घरासमोर आंदोलन केले. परंतु केजारीवाल यांना अटकेचा निर्णय भाजपाचा नसून तो कोर्टाचा निर्णय आहे. कर नाही त्याला डर कसला? केवळ भाजपाला बदनाम करण्यासाठीच हा आंदोलनाचा घाट आहे  असे म्हणत भाजपाची पाठराखण केली.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!