माय महाराष्ट्र न्यूज:शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाची बहुप्रतीक्षित लोकसभा उमेदवार यादी उद्या जाहीर होणार आहे.
महाविकास आघाडीच्या जागावाटपाबाबत उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी आज संध्याकाळी महत्त्वपूर्ण बैठक झाली आहे. या बैठकीत जागावाटपाचे अंतिम सूत्र ठरणार असून शरद
पवारांसह मविआचे प्रमुख नेते उपस्थित होते. त्यानंतर ठाकरे गटाची पहिली यादी उद्या, मंगळवार २६ मार्च रोजी घोषित होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाच विद्यमान खासदारांसह १९ संभाव्य
उमेदवारांची यादी समोर आली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडीच्या मविआ प्रवेशाच्या शक्यता धूसर झाल्याचं चित्र आहे.विदर्भातील पहिल्या टप्प्यातील महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार
जाहीर झाले आहेत. रामटेकची जागा शिवसेना लढवत आल्यामुळे आणि विद्यमान खासदारही एकनाथ शिंदेंसोबत असला तरी शिवसेनेचा असल्यामुळे ठाकरे गटाने त्यावर दावा सांगितला होता. या
जागेवरुन काँग्रेस आणि ठाकरेंमध्ये जोरदार रस्सीखेच सुरु होती. मात्र अखेर रामटेकमधून काँग्रेसने उमेदवार जाहीर केल्याने या वादावर पडदा पडल्याचं दिसत आहे.रामटेकसह नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर,
चंद्रपूर या पाचही जागांवर काँग्रेसने उमेदवार जाहीर केले आहेत. पहिल्या टप्प्यातील पाच मतदारसंघात येत्या १९ एप्रिल रोजी निवडणूक आहे. मात्र उमेदवारी अर्ज भरण्याची २७ मार्च ही शेवटची तारीख आहे.
पाचपैकी चार मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी लढत आहे. तर रामटेकमध्ये शिवसेना विरुद्ध काँग्रेस असे चित्र आहे.दरम्यान, उद्धव ठाकरे उद्या आपले उमेदवार जाहीर करण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’ वर्तमानपत्रातून उमेदवार यादी जाहीर होणार आहे. पहिल्या यादीत १५ ते १६ नावं असतील, अशी माहिती खासदार संजय राऊत यांनी दिली. तर शरद पवार गटाची
यादीही दोन दिवसात (२८ मार्च) जाहीर होण्याची शक्यता आहे. ज्या जागांवर तिढा आहे, तिथले उमेदवार नंतर जाहीर होण्याची शक्यता आहे.
ठाकरे गटाची संभाव्य उमेदवार यादी
दक्षिण मुंबई – अरविंद सावंत
उत्तर पश्चिम मुंबई – अमोल कीर्तिकर
उत्तर पूर्व (ईशान्य) मुंबई – संजय दिना पाटील
दक्षिण मध्य मुंबई – अनिल देसाई
ठाणे – राजन विचारे
कल्याण डोंबिवली – केदार दिघे
पालघर- भारती कामडी
रायगड – अनंत गिते
रत्नागिरी सिंधुदुर्ग – विनायक राऊत
धाराशिव- ओमराजे निंबाळकर
परभणी- संजय जाधव
छत्रपती संभाजीनगर – चंद्रकांत खैरे
हिंगोली – नागेश पाटील आष्टीकर
सांगली – चंद्रहार पाटील
मावळ- संजोग वाघेरे
नाशिक- विजय करंजकर
शिर्डी – भाऊसाहेब वाकचौरे
बुलढाणा- नरेंद्र खेडेकर
यवतमाळ वाशिम – संजय देशमुख