Tuesday, December 16, 2025

प्रीतम मुंडे शेवगाव-पाथर्डी मतदारसंघातून विधानसभा लढवणार?

WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
WhatsApp Image 2025-01-30 at 3.26.50 PM
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:पंकजा मुंडे यांना भाजपकडून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तर, सध्याच्या विद्यमान खासदार आणि पंकजा मुंडे यांची बहिण असलेल्या प्रीतम

मुंडे यांचा पत्ता मात्र पक्षाकडून कापण्यात आला आहे. पंकजा मुंडेंना उमेदवारी दिली, पण त्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली. मात्र, असं असलं तरीदेखील प्रीतम मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डी

विधानसभा मतदारसंघात उमेदवारी द्यावी, असा सूर काही कार्यकर्त्यांमधून आळवू लागल्याचं पाहायला मिळत आहे.पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीमधून विधानसभा लढवावी, अशी

अनेक वेळा मागणी झाली होती. मात्र यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांना भाजपनं उमेदवारी दिली आहे. त्यासाठी प्रीतम मुंडे यांना आपली जागा सोडावी लागली. आता प्रीतम मुंडे

यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभा लढवावी, अशी भावना व्यक्त होताना दिसत आहे. मधल्या काळात पंकजा मुंडे यांनी शेवगाव-पाथर्डीतून विधानसभा लढवावी अशी लोकांची भावना होती. मात्र,

आता प्रीतम मुंडे यांच्याही नावाची चर्चा होत आहे. जर प्रीतम मुंडे यांना शेवगाव-पाथर्डीतून लढण्याची इच्छा असेल, तर आमच्या त्यांना शुभेच्छा आहेत आणि त्यांनी शेवगाव-पाथर्डीतून निवडणूक लढवावी,

अशी माझी भूमिका आहे, असं भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश सचिव अरुण मुंढे यांनी म्हंटलं आहे.शेवगाव-पाथर्डी विधानसभेच प्रतिनिधित्व भाजपच्या विद्यमान आमदार मोनिका

राजळे या करतात. मोनिका राजळे यांच्या विजयात मुंडे कुटुंबीयांचा मोठा वाटा आहे. शेवगाव-पाथर्डी मतदारसंघात वंजारी समाजाचा मतदार मोठ्या संख्येनं आहे. त्यामुळे मुंडे कुटुंबाचा या मतदारांवर मोठा

प्रभाव आहे. त्यातच आता भाजपमधीलच काही पदाधिकाऱ्यांनी प्रीतम मुंडे यांनी पाथर्डी-शेवगाव मधून उमेदवारी दिली तर त्यांना निवडून आणू असं म्हटलं आहे. दरम्यान, उमेदवारी जाहीर

झाल्यानंतर अहमदनगर दौऱ्यावर असलेल्या पंकजा मुंडे यांना याबाबत विचारलं असता त्यांनी आताच या प्रश्नाचं उत्तर देण्याची गरज नाही असे त्या म्हणाल्या होत्या.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!