Monday, October 14, 2024

शनिवारपासून गुहात कानिफनाथ महाराजांचा यात्रोत्सव जोरदार नियोजन सुरू , जिल्ह्यातून भाविक येणार

भेंडा/गुहा राहुल कोळसे.नगर जिल्ह्यासह राज्यात नावाजलेल्या राहुरी तालुक्यातील गुहा येथील कन्होबा उर्फ चैतन्य कानीफनाथांच्या यात्रेस शनिवार 30 मार्च पासून प्रारंभ होत आहे.

दोन दिवस चालणार्‍या यात्रेसाठी विविध जिल्ह्यांतून मोठ्या संख्येने भाविक गुहा येथे कानिफनाथ महाराजांचा दर्शनासाठी येतात. शनिवारी 30 मार्च रोजी रंगपंचमीच्या दिवशी यात्रेचा मुख्य दिवस आहे. यात्रेसाठी

येणार्‍या भाविकांची संख्या ही लक्षणीय असण्याची शक्यता असून परिणामी भाविकांची सोय व्हावी यासाठी ग्रामस्थ नियोजन करत आहे.यात्रेनिमित्त विविध हॉटेल व्यावसायीक दाखल झाले आहेत. रहाट, पाळणे,

मनोरंजनाची साधने, प्रसाद, खेळणीची दुकाने थाटण्यासही दोन तीन दिवसात सुरुवात होणार आहे.यात्रेसाठी मोठ्या संख्येने भावीक येथे येतात. दोन दिवस चालणार्‍या यात्रेची सर्व तयारी देवस्थान समिती व ग्रामपंचायतीकडून सुरू आहे.

भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग, मुख्य कानीफनाथ मंदीर व परीसरात सुशोभिकरण, दर्शन बारी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहनतळ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुख्य यात्रा मैदान परिसर

स्वच्छ केला आहे,रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या कामाने वेग घेतला असून मंदिर व मंदिर परिसर व आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्‍याची नजर असणार आहे .

या वर्षी मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येणार असल्याचे बोले जात आहे व यात्रेसाठी मोठ्या संख्येने भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुहा येथील कन्होबा उर्फ चैतन्य कानीफनाथ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.

[ असा असेल यात्रोत्सव

दिंनाक 28 मार्च रोजी करण्यात गंगाजल आणण्यासाठी भक्त पुणतांब्याला जाणार,शुक्रवार 29 सायंकाळी मानाचा नैवेद्य व मानाची काढी मिरवणूक ,शनिवार 30 मार्च यात्रा मुख्य दिवस सकाळी ८ वाजता कावड व गंगाजल मिरवणूक,सकाळी ९ वाजता गंगाजल, अभिषेक व होम हवन व सायंकाळी काढी व छबिना मिरवणूक , रात्री ९ वाजता आर्कीस्ट्रा,रविवारी ३१ मार्च सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्ती स्पर्धा.]

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!