Monday, May 27, 2024

नगर लोकसभा:रात्री उशिरा फडणवीसांच्या घरी भाजपाच्या या नेत्यांची बैठक; कोणत्या मुद्द्यांवर चर्चा?

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणूक होत आहे. अशात राजकीय वर्तुळात विविध घडामोडी घडत आहेत. मुंबईत काल रात्री उशिरा भाजपची महत्वाची

बैठक झाली. या बैठकीला अहमदनगरमधील भाजपचे नेते उपस्थित होते. माजी मंत्री राम शिंदे सागर बंगल्यावरच्या बैठकीला उपस्थित होते. राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील

सागर बंगल्यावर बैठकीला उपस्थित होते. अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार सुजय विखे आणिस भाजप नेते हर्षवर्धन पाटील सागर बंगल्यावर या बैठकीत उपस्थित होते.

या बैठकीनंतर राम शिंदे यांनी माध्यमांशी बोलताना विविध मुद्यांवर भाष्य केलं.देवेंद्र फडणवीस यांच्या घरी झालेल्या बैठकीतील मुद्द्यांवर राम शिंदे यांमी सविस्तर प्रतिक्रिया दिली. अहिल्यानगर लोकसभेच्या

संदर्भात देवेंद्र फडणवीस यांच्या निवसस्थानी बैठक झाली. या बैठकीला राधाकृष्ण विखे पाटील, सुजय विखे पाटील हे उपस्थित होते. गेल्या अनेक वर्षांपासूनचे विषय होते. या निवडणुकीला सामोरे

जायची इच्छा होती. मी भाजपचा कार्यकर्ता असल्याने, नेतृत्वाने उमेदवारीचा जो निर्णय घेतला, तो मान्य आहे. त्या जागेसाठी इच्छुक होतो. आता अडचणीचं निराकरण झालं आहे, असं राम शिंदे म्हणाले.

अबकी बार 400 पारचा नारा दिला आहे. त्यासाठी ही महत्त्वाची बैठक बोलावली होती. माझ्या मनातील प्रश्नांसाठी फडणवीस यांनी यशस्वी मध्यस्ती केली. आपल दुःख आहे ते कोणीतरी समजून घेतलंय

त्या नेतृत्वाचा आदेश मानला पाहिजे. अहिल्या नगरचा भाजपचा खासदार झाला पाहिजे. यादृष्टीने बैठक सकारात्मक बैठक झाली, असं राम शिंदे म्हणाले.राम शिंदे नाराज असल्याची चर्चा होत होती. त्यावर

पक्षीय पातळीवर वाद मिटले आहेत. वैयक्तिक मतभेद असले तरी निवडणुकीत ते काढायचे नसतात. पक्षाने दिलेला आदेश मानून अबकी बार 400 साठी आम्ही तयार आहोत, असं राम शिंदे म्हणाले.

देवेंद्र फडणवीस व्हेटो वापरला का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा नाही… माझ्यावर व्हेटो वापरायची गरज नाही. पक्षात आदेश हा शिरसावंद्य असतात. मागील पाच वर्षाच्या काळातील इतंभुत चर्चा झाली.

आजची बैठक यशस्वी झाली. गळाभेट झाली नाही, मात्र हस्तांदोलन झालं, असं राम शिंदे म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!