भेंडा राहुल कोळसे- राहुरी तालुक्यातील गुहा येथील कान्होबा उर्फ श्री कानिफनाथ विश्वस्त मंडळाच्यावतीने साजरा करण्यात येणाऱ्या यात्रोत्सव कमिटीच्या अध्यक्षपदी शिवाजी मांजरे तर उपाध्यक्षपदी पोपट शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. विश्वस्त मंडळाच्या बैठकीत या नियुक्त्या करण्यात आल्या.
या समितीत सचीवपदी रवींद्र डौले, सहसचीवपदी मंगेश काकडे, खजिनदारपदी अनिल सौदागर, सह खजिनदारपदी सागर खपके तसेच मंदिर व्यवस्थापकपदी हर्षद कोळसे तर कार्यक्रम व्यवस्थापकपदी सचीन लांबे यांची निवड करण्यात आली आहे.
भक्तांना सुलभपणे दर्शन घेता यावे यासाठी दर्शन रांग, मुख्य कानीफनाथ मंदीर व परीसरात सुशोभिकरण, दर्शन बारी व्यवस्था, विद्युत व्यवस्था, वाहनतळ,पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मुख्य यात्रा मैदान परिसर स्वच्छ केला आहे,रस्त्यांची व्यवस्था तसेच मंदिरात गर्दीचे नियंत्रण करण्यासाठीच्या कामाने वेग घेतला
असून मंदिर व मंदिर परिसर व आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेर्याची नजर असणार आहे या वर्षी मोठ्या संख्येने भक्त दर्शनासाठी येणार असल्याचे बोले जात आहे यात्रेसाठी मोठ्या संख्येने भक्तांनी दर्शनाचा लाभ घ्यावा असे आवाहन गुहा येथील कन्होबा उर्फ चैतन्य कानीफनाथ ट्रस्टच्या वतीने करण्यात आले आहे.
[ दिंनाक 28 मार्च रोजी करण्यात गंगाजल आणण्यासाठी भक्त पुणतांब्याला जाणार,शुक्रवार 29 सायंकाळी मानाचा नैवेद्य व मानाची काढी मिरवणूक ,शनिवार 30 मार्च यात्रा मुख्य दिवस सकाळी ८ वाजता कावड व गंगाजल मिरवणूक,सकाळी ९ वाजता गंगाजल, अभिषेक व होम हवन व सायंकाळी काढी व छबिना मिरवणूक , रात्री ९ वाजता आर्कीस्ट्रा,रविवारी ३१ मार्च सायंकाळी ४ वाजता भव्य कुस्ती स्पर्धा.]