शिर्डी
श्री साईबाबा संस्थानच्या सुरक्षा रक्षकाचा प्रामाणिकपणा साईभक्तला अनुभवयास मिळाला.आध्रप्रदेश येथील साईभक्त साईबाबांच्या दर्शनाकरिता आलेले असताना दर्शन रांगेत हरवलेली त्यांची 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन त्या भविकाला परत करण्यात आली.
याबाबद अधिक माहिती अशी की,
आज गुरुवार दि.28 मार्च रोजी सकाळी आध्रप्रदेश येथील साईभक्त साईबाबांच्या दर्शनाकरिता आलेले असताना दर्शन रांगेत त्यांचे 16 ग्रॅम वजनाची सोन्याची चैन हरविली होती. त्यांनी संस्थानच्या कार्यालयात येऊन तक्रार दिली. साईबाबा संस्थान सुरक्षेचे सुरक्षा रक्षक श्री. दीपक आसने यांना सोन्याची चैन आढळून आली. त्यांनी सुमारे 1 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन कार्यालयात आणून दिली. आजही जगात प्रामाणिकपणा टिकून आहे हे यातून दिसून आले. वास्तविक पाहता श्री.आसने यांच्या महिन्याच्या पगाराच्या पाच पट किंमत असलेली वस्तू त्यांनी कोणताही मोह न दाखवता परत केली. त्यांचा यथोचित सत्कार करून त्यांच्यात हस्ते भक्ताला ओळख पटवून चैन परत केली.
संस्थानचे कार्यकारी अधिकारी श्री. हुलहुले, पोलिस उपनिरीक्षक श्री.माळी , लेखनिक संजय गावड़े आदी यावेळी उपस्थित होते.