माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही महिन्यांमध्ये प्रचंड राजकीय घडामोडी घडल्या. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातही फूट पडली. केंद्रीय निवडणूक आयोगाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं
नाव आणि चिन्ह दिलं. असं असलं तरी एक महत्त्वाची अपडेट समोर येत आहे. अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला त्यांच्याच पक्षाचं घड्याळ चिन्ह मिळणार नाही, अशी माहिती समोर येत आहे. पण ही बातमी महाराष्ट्र आणि नागालँडच्या राष्ट्रवादीच्या उमेदवारांबाबत नाही.
तर लक्ष्यद्वीपमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराबाबत आहे. अजित पवारांच्या पक्षाला लोकसभा निवडणुकीसाठी एका मतदारसंघात घड्याळ चिन्ह मिळणार नाही. अजित पवार यांच्या गटाच्या उमेदवाराला लक्षद्वीपमधील लोकसभा निवडणुकीसाठी घड्याळ चिन्ह वापरता येणार नाही. तसेच अजित पवार गटाला
महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये चिन्ह वापरायला तूर्तास परवानगी मिळाली आहे.लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान आता जवळ येत आहे. येत्या 19 एप्रिलला देशभरात लोकसभा निवडणुकीचं पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडणार आहे. लक्षद्वीपमध्ये पाहिल्या टप्प्यात मतदान होणार आहे. या ठिकाणी
राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून निवडणुकीच्या रणांगणात उमेदवार उतरवण्यात आलाय. पण लक्षद्वीपमध्ये अजित पवार यांच्या पक्षाचे उमेदवार युसूफ टी पी यांना दुसऱ्या चिन्हावर निवडणूक लढवावी लागणार आहे.अजित पवार यांच्या पक्षाला दुसऱ्या टप्प्यापासून सातव्या टप्प्यापर्यंतच्या मतदान
प्रक्रियेत घड्याळ चिन्ह देशभरात वापरता येणार आहे. पण पहिल्या टप्प्यात वापरता येणार नाही. महाराष्ट्र आणि नागालँडमध्ये घड्याळ चिन्ह राष्ट्रवादी काँग्रेसकडे आहे. त्यामुळे तिथल्या निवडणुकीत घड्याळ चिन्ह अजित पवार यांच्या पक्षाला मिळणारच आहे. तसेच 2024 सार्वत्रिक निवडणुकांत अजित पवार यांच्या प्रत्येक उमेदवाराला घड्याळावर लढता यावे, यासाठी त्यांनी अर्ज केला होता.