नेवासा
आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भयी वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी केंद्रीय सुरक्षा दल व पोलीस संयुक्त विद्यमाने जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करणे व गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे यासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेवासा शहर व कुकाणा येथे उद्या शुक्रवार दि. 29 मार्च रोजी रूट मार्चचे आयोजन करण्यात आल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील रूट मार्चचा तपशिल खालील प्रमाणे . .
सकाळी 9.00 वाजता नेवासा फाटा येथे आगमन,9.30 वाजता कुकाना येथे आगमन,9.30 ते 10.30 कुकाना गावामध्ये रूट मार्च,11.00 वाजता नेवासा येथे आगमन,सकाळी 11.00 ते दुपारी 12.00 वाजता नेवासा गावामध्ये रूट मार्च,दुपारी 12.30 वाजता पाकशाळा येथे जवानांचे दुपारचे जेवण.
दुपारी 13.30 वाजता अहमदनगरकडे रवाना.