माय महाराष्ट्र न्यूज:बँकेचा आणि खातेधारकांचा संबंध एका अर्थी हल्ली दर दिवशी येत आहे असं म्हणणं अतिशयोक्ती ठरणार नाही. कारण, दर दिवशी डिजिटल पद्धतीनं पैशांची देवाणघेवाण करत असताना कळत नकळत या बँकेशी आपण जोडलो जात आहोत.
हल्ली बँकेची जवळपास अनेक कामं Online Banking च्या माध्यमातून अतिशय सहजपणे पूर्ण होतात. पण, काही कामांसाठी मात्र प्रत्यक्ष बँकेत हजर राहावं लागतं. एप्रिल महिन्यासाठी तुमचीही अशीच काही आर्थिक आणि त्याहूनही बँकेची कामं ताटकळली आहेत का? तर ही कामं नेमकी केव्हा
पूर्ण करायची हे आताच ठरवा. कारण, RBI नं जाहीर केलेल्या यादीनुसार एप्रिल महिन्यामध्ये विविध तारखांना विविध राज्यांमध्ये बँका 3 – 4 नव्हे तर तब्बल 14 दिवस बंद असणार आहे. राज्याराज्यातील सणवार आणि तत्सम इतर महत्त्वपूर्ण दिवसांच्या अनुषंगानं सार्वजनिक सुट्ट्या असल्या कारणानं एप्रिल महिन्यात 14 दिवस बँकांना सुट्टी असणार आहे.
1 एप्रिल 2024 – वार्षिक आर्थिक वर्ष समाप्तीनिमित्त बँकांचं कामकाज बंद
5 एप्रिल 2024 – बाबू जगजीवनराम जयंती, जुमत जुमातूल विदा निमित्तानं तेलंगणा, जम्मू आणि श्रीनजरमध्ये बँकांना सुट्टी
7 एप्रिल 2024 – रविवारची आठवडी सुट्टी
9 एप्रिल 2024 – गुढी पाडवा, उगडी, तेलुगू नववर्ष, चैत्र नवरात्र निमित्त बंगळुरू, चेन्नई, हैदराबाद, इंफाळ, जम्मू, मुंबई, नागपूर, पणजी येथे बँका बंद.
10 एप्रिल 2024 – ईदनिमित्त कोच्ची, केरळ येथे बँकांना सुट्टी
11 एप्रिल 2024 – ईदनिमत्त चंदीगढ, गंगटोक, कोच्ची वगळता संपूर्ण देशात बँकांना सुट्टी.
13 एप्रिल 2024 – महिन्यातील दुसरा शनिवार असल्या कारणानं बँकांना सुट्टी
14 एप्रिल 2024 – रविवारची आठवडी सुट्टी
15 एप्रिल 2024 – बोहार बिहू आणि हिमाचल दिवसानिमित्त शिमला, गुवाहाटी येथे सुट्टी
17 एप्रिल 2024- रामनवमी निमित्त अहमदाबाद, बेलापुर, भोपाल, भुवनेश्वर, चंडीगढ़, देहरादून, गंगटोक, हैदराबाद, जयपुर, कानपुर,लखनऊ, पटना, रांची, शिमला, मुंबई आणि नागपूर येथे बँकांना सुट्टी
20 एप्रिल 2024 – गरिया पूजा निमित्त अगरतळा येथील बँकांना सुट्टी
21 एप्रिल 2024 – रविवारची आठवडी सुट्टी
27 एप्रिल 2024 – चौथ्या शनिवारनिमित्त बँकांना सुट्टी
28 एप्रिल 2024 – रविवारची आठवडी सुट्टी
देशभरातील बँका विविध प्रसंगी बंद राहिल्या तरीही पैशांची देवाणघेवाण ऑनलाईन पद्धतीनं सुरुच राहणार आहे. याशिवाय खातेधारकांना एटीएम कार्डचाही वापर करता येणार आहे. त्यामुळं ही दिलासादायक बाब.