Monday, October 14, 2024

सावधान! राज्यात पुढचे 2 दिवस उष्णतेची लाट, IMD चा इशारा

माय महाराष्ट्र न्यूज:महाराष्ट्रात दिवसेंदिवस तापमानात वाढ होत आहे. मार्च महिन्यातच राज्यातील बहूतांश शहरांना तापमानाची चाळीशी पार केली आहे. ही परिस्थिती पुढचे काही दिवस कायम राहणार आहे.

अशात येत्या दोन दिवसांत राज्यातील तापमानात आणखी वाढ होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवला आहे. या 2 दिवसात राज्यात उष्णतेची लाट राहील.हवामान विभागाच्या माहितीनुसार, उत्तर आणि दक्षिण भारताकडून वाहणाऱ्या उष्ण वाऱ्यामुळे राज्यातील तापमानात वाढ होत आहे. वाढत्या

तापमानाचा सर्वाधिक फटका विदर्भ, मराठवाडा, उत्तर- मध्य महाराष्ट्राला बसत आहे. या भागातील बहुतांश ठिकाणी तापमानाने मार्च महिन्यातच 40 अंशाचा टप्पा पार केला आहे. यात आकोला, जळगाव, मालेगाव, बीड, जालना, नांदेड, परभणी, यवतमाळ, लातूर,

धाराशिव, सोलापूर, नागपूर, वर्धा, बुलढाणा, ब्रह्मपुरी, यवतमाळ, छत्रपती संभाजीनगरचा समावेश आहे.तापमानात होत असलेली ही वाढ लक्षात घेता खबरदारी म्हणून यापुर्वी ठाणे जिल्हा परिषदेने उपाययोजनेच्या स्वरुपात शाळेच्या वेळा पत्रकात बदल केला आहे.

तापमानात वाढ झाल्यामुळे ग्रमीण तसेत दुर्गम भागात लोकांच्या जिवाची लाहीलाही होत आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याला होणारा धोका लक्षात घेत ठाणे जिल्हा परिषद प्रशासनाने सर्व जिल्हा परिषद शाळांच्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्यानुसार 31 मार्च 2024 पर्यंत

सर्व प्राथमिक शाळा सकाळी 7:30 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत भरवल्या जात आहे. 1 एप्रिल 2024 पर्यंत हा निर्णय कायम राहणार आहे. मात्र, सध्याची स्थिती लक्षात घेता ठाणे जिल्हा परिषद शाळेच्या वेळातील हा बदल कायम ठेवते की, यात अजून काही बदल होईल याकडे विद्यार्थी आणि पालकांचे लक्ष आहे.

वाढत्या तापमानाच्या या पार्श्वभूमीवर अकोला जिल्ह्याने बुधवारी तपमानाचा उच्चांक गाठला होता. या ठिकाणी तापमानाने 42 अंशाचा टप्पा गाठला होता. यंदाच्या तापमानातील आतापर्यंतचे ते सर्वोच्च तापमान होते. तर बऱ्याचशा शहरांनी तापमानाची

चाळीशी गाठली आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे नगरिकांच्या जीवाची लाहीलाही होत आहे. त्यात पुढचे दोन दिवस राज्यात उष्णतेची लाट वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवल्याने चिंता वाढली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!