Monday, May 27, 2024

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत सीमा सुरक्षा बल व पोलिसांचा रूट मार्च

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

आगामी लोकसभा निवडणूक प्रक्रिया शांततेत निर्भयी वातावरणामध्ये पार पाडण्यासाठी सीमा सुरक्षा बल व पोलीस संयुक्त विद्यमाने जनसामान्यांमध्ये विश्वास निर्माण करणे व गुन्हेगारांवर वचक निर्माण करणे यासाठी नेवासा पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये नेवासा शहर व कुकाणा येथे शुक्रवार दि. 29 मार्च रोजी रूट मार्च केल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

नेवासा पोलीस ठाणे हद्दीत आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणूक सन 2024 व आगामी सण उत्सव अनुषंगाने कुकाणा शहर, नेवासा फाटा, नेवासा शहर या ठिकाणी निवडणूक प्रक्रिया भयमुक्त वातावरणात व शांततेत पार पाडणे दृष्टीने सीमा सुरक्षा बल व पोलीस असा संयुक्त रूट मार्च घेण्यात आला.
सदर रूट मार्च करीता सीमा सुरक्षा बलाचे
कंपनी कमांडर श्री.अखिलेश कुमार गुप्ता यांचे सह 32 जवान, पोलीस ठाणे नेवासा कडील 6 अधिकारी, 25 अमलदार,10 होमगार्ड असे सहभागी झाले होते.

सदर रूट मार्च सकाळी 10.05 वाजता सुरू होऊन 11.50 वाजता पार पडला आहे.सदरचा रूट मार्च हा लक्ष वेधून घेणारा ठरला. सदर रूट मार्चचा सकारात्मक परिणाम दिसून आला.
सदरचा रूट मार्च मुख्यतः सर्वसामान्य नागरिकांच्या मनामध्ये सुरक्षिततेची भावना व विश्वास निर्माण व्हावा व गुन्हेगारांवर नियंत्रण राहावे हा होता.
सदरचा रूट मार्च पोलीस अधीक्षक राकेश ओला, अप्पर पोलीस अधीक्षक वैभव कल्लुबर्मे व उप विभागीय पोलीस अधिकारी सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!