Sunday, October 6, 2024

शरद पवार गटाकडून लोकसभा उमेदवारांची पहिली यादी जाहीर नगरमधून या नेत्याला संधी

माय महाराष्ट्र न्यूज:शरद पवारांच्या राष्ट्रवादीची पहिली उमेदवार यादी जाहीर करण्यात आली आहे. पहिल्या यादीत बारामतीतून सुप्रिया सुळे, शिरुर लोकसभा मतदारसंघातून अमोल कोल्हे यांना संधी देण्यात आली आहे. तर नुकतेच अजित पवार

गटातून शरद पवार गटात आलेल्या निलेश लंके यांना अहमदनगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद उमेदवारांची नावे घोषित केली आहेत.

कोणाला कोठून उमेदवारी

वर्धा – अमर काळे

दिंडोरी – भास्करराव भगरे

बारामती -सुप्रिया सुळे

शिरुर- डॉ. अमोल कोल्हे

अहमदनगर- निलेश लंके

नुकताच शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या अमर काळे आणि निलेश लंके यांना लोकसभेच्या मैदानात उतरवण्यात आलं आहे. निलेश लंके यांना अहमदनगरमधून तर अमर काळे यांना वर्धा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी घोषित करण्यात आली आहे. भाजपने

नगरमधून सुजय विखे यांना उमेदवारी जाहीर केल्यानंतर शरद पवारांनी त्यांच्याविरोधात निलेश लंके यांना उमेदवारी दिली आहे. विशेष म्हणजे निलेश लंके आमदारकीचा राजीनामा देऊन विखेंविरोधात मैदानात उतरले आहेत. दिंडोरी लोकसभा निवडणुकीसाठी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून भास्कर भगरे यांची उमेदवारी आज जाहीर

करण्यात आली. केंद्रीय मंत्री डॉ.भारती पवार यांची दिंडोरी लोकसभेसाठी पुनश्च भाजपकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर महाविकास आघाडीच्या उमेदवारांचा तिढा सुरू होता. अनेक इच्छुक असल्याने उमेदवार जाहीर केला जात नव्हता आज अखेर दिंडोरी लोकसभेसाठी महाविकास आघाडीचा उमेदवार भास्कर

भगरे यांची उमेदवारी राष्ट्रवादीकडून जाहीर करण्यात आली. राष्ट्रवादीच्या 5 उमेदवारांची घोषणा केली आहे. यामध्ये विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघातून चौथ्यांदा उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. सु्प्रिया सुळे यांची सुनेत्रा पवार यांच्या लढत होणार असल्याचे निश्चित मानले जात आहे.

तर अमोल कोल्हे यांना शिरुरमधून दुसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली आहे. शिवाजी आढळराव पाटील यांची पुन्हा एकदा अमोल कोल्हे यांच्याशी लढत होणार आहे. 2019 च्या निवडणुकीत अमोल कोल्हे यांनी आढळराव पाटील यांचा पराभव केला होता.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!