Saturday, December 21, 2024

देडगांव येथील मंदीर चोरीच्या गुन्ह्यातील आरोपी जेरबंद

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील देडगांव येथील मंदीर चोरीच्या गुन्ह्यातील एका आरोपीला 3 लाख 17हजार 500 रुपये किंमतीचे मुद्देमालासह स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केले.

याबाबद अधिक माहिती अशी की,
दि. 21/03/24 रोजी फिर्यादी श्री. चंद्रकांत भानुदास मुंगसे (वय 49) रा. देडगांव, ता. नेवासा यांचे गांवातील विविध मंदीरातील दानपेट्या फोडुन 21 हजार रुपये रोख रक्कम अनोळखी इसमांनी चोरुन नेले बाबत नेवासा पो.स्टे.गु.र.नं. 280/2024 भादवि कलम 379, 34 प्रमाणे चोरीचा गुन्हा दाखल आहे.मंदीर चोरीची घटना घडल्यानंतर पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे पोनि दिनेश आहेर यांना सदर गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आदेशित केले होते.
त्यानुसार श्री. आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील पोउपनि समाधान भाटेवाल व अंमलदार रविंद्र कर्डींले, अतुल लोटके, संदीप दरंदले, फुरकान शेख, विजय ठोंबरे, प्रमोद जाधव, रविंद्र घुगांसे व चंद्रकांत कुसळकर अशांचे पथक नेमुन गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणणे बाबत आवश्यक सुचना देवुन पथकास रवाना केले. पथकाने घटना ठिकाण व आजु बाजूचे सीसीटीव्ही फुटेज प्राप्त करुन त्या आधारे आरोपींचे वर्णन व गुन्हा करण्याची पध्दतीचा अभ्यास करुन, रेकॉर्डवरील गुन्हेगारांची माहिती घेताना पथकास वर नमुद गुन्हा संशयीत इसम नामदेव आव्हाड रा. घनसांवगी, जिल्हा जालना याने त्याचे साथीदारासह केल्याची खात्रीशीर माहिती मिळाल्याने पथकाने संशयीताचा शोध घेता तो मिळुन आल्याने त्यास शिताफीने ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या इसमास पोलीस पथकाची ओळख सांगुन त्याचे नाव गांव विचारले असता त्याने त्याचे नाव 1) नामदेव लक्ष्मण आव्हाड (वय 25) रा. घुंन्शी, ता. घनसांवगी, जिल्हा जालना असे असल्याचे सांगितले. त्याचेकडे वर नमुद गुन्ह्याचे अनुषंगाने विचारपुस करता त्याने त्याचे साथीदार नामे सतिष माणिक काळे (फरार), हिरा माणिक काळे दोन्ही रा. घनसांवगी, जिल्हा जालना (फरार), विजय अशोक चव्हाण रा. बालाजी देवगाव, ता. नेवासा (फरार) व रामा (विजय चव्हाण याचा नातेवाईक) (फरार) पुर्ण नाव माहित नाही. यांचे सोबत मिळुन ताब्यातील स्विफ्ट गाडीत येवुन गुन्हा केल्याचे सांगितले.

आरोपीस अधिक विश्वासात घेवुन अहमदनगर जिल्ह्यात आणखीन कोठे कोठे गुन्हे केले या बाबत विचारपुस करता आरोपीने सर्वांनी मिळुन काही दिवसांपुर्वी शेवगांव ते बोधेगांव जाणारे रोडवरील बंद घर फोडुन घरातील रोख रक्कम चोरी केल्याचे सांगितल्याने जिल्हा गुन्हे अभिलेख पडताळणी करता शेवगांव पो.स्टे.गु.र.नं. 219/2024 भादविक 454, 380 प्रमाणे दाखल गुन्हा उघडकिस आला आहे.

आरोपीची अंगझडती घेता त्याचे अंगझडतील मिळुन आलेल्या रोख रकमेबाबत विचारपुस करता आरोपीने मंदीर चोरीचे गुन्ह्यातील 2हजार 500 रुपये रोख व घरफोडीच्या गुन्ह्यातील 15 हजार रुपये रोख रक्कम असल्याचे सांगितल्याने आरोपीस दोन्ही गुन्ह्यातील 17 हजार 500 रुपये रोख व गुन्हा करताना वापरलेली 3 लाख रुपये किंमतीची स्विफ्ट कार असा एकुण 3 लाख 17 हजार 500 रुपये किंमतीच्या मुद्देमालासह ताब्यात घेवुन नेवासा पो.स्टे.गु.र.नं. 280/2024 भादविक 379, 34 प्रमाणे दाखल गुन्ह्याचे तपासात हजर केले आहे. पुढील तपास नेवासा पोलीस स्टेशन करीत आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!