पुणे
वन विभाग, डीईएस पुणे विद्यापीठ आणि वनवासी कल्याण आश्रम यांच्यामार्फत ‘लोकसहभागातून वन संवर्धन आणि पर्यावरण पूरक उपजीविका’ या दोन दिवसीय कार्यशाळेचे उद्घाटन मा. मंत्री वने श्री. गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले.
या उदघाट्न सोहळ्यात देवगिरी कल्याण आश्रमाचे चेत्राम पवार, डीईएस पुणे विद्यापीठाचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य, विश्वस्त अनंत जोशी, विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. नितीन कुलकर्णी, वनवासी कल्याण आश्रमाचे गिरीश कुबेर या वेळी उपस्थित होते.
राज्याच्या विकासकामांसाठी वन विभाग आर्थिक सक्षम होऊन राज्य सरकारला पैसे देऊ शकेल. त्या दृष्टीने येत्या चार वर्षांत क्षमता निर्माण केली जाणार असल्याची भूमिका राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांनी मांडली.
वन विभाग, डीईएस पुणे विद्यापीठ आणि वनवासी कल्याण आश्रम यांच्यातर्फे आयोजित ‘लोकसहभागातून वन संवर्धन आणि पर्यावरण पूरक उपजीविका’ या दोन दिवसांच्या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी वनमंत्री, श्री. गणेश नाईक बोलत होते.
यावेळी वन विभागाला आर्थिक दृष्ट्या सक्षम करणार असल्याचा विश्वास वनमंत्री श्री. गणेश नाईक यांनी व्यक्त केला.