Monday, April 29, 2024

लकेंचा विखेंना इशारा: तुमच्या दडपशाही व दादागिरीला कोणी भीक घालणार नाही

IMG-20240312-WA0002
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार निलेश लंके यांनी भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधला. निलेश लंके यांनी आज त्यांच्या कार्यकर्त्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीवेळी निलेश लंके यांनी भूमिका मांडली.

यावेळी निलेश लंकेंनी विखे पाटलांवर नाव न घेता निशाणा केली. “रावणाचा देखील नाश झाला आहे, अहंकाराचा नाश झाला तर तुम्ही कोण? दिवा फडफड करत आहे. तुमच्याकडे यंत्रणा आहे. मात्र आमच्याकडे जीवाभावाचे मावळे आहेत. मी आयुष्यात पैसे कमवले नाहीत. लाख मोलाची माणसं कमावले आहेत.

त्यांची किंमत होऊ शकत नाही. मला माझं साम्राज्य टिकण्यासाठी राजकारण करायचं नाही. मला जिरवा जिरवीचं राजकारण करायचं नाही. लोकांचं काम करण्यासाठी मला काम करायचं आहे. मी सर्वसामान्य कुटुंबातील आहे. तुम्हाला इतका घाम फुटण्याची गरज काय?”, असा सवाल निलेश लंके यांनी केला.

अनेक आश्वासन दिले. मात्र एकही योजना आली नाही. केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांकडे गेले आणि तिकीट द्या विनंती केली. मात्र त्यांना कोणीतरी सांगितलं असेल कांदा निर्यात बंदी उठणार आहे. तर लगेच अनेक आश्वासन दिले. मात्र एकही योजना आली नाही. आम्ही जे बोलतो तेच करतो, दुसऱ्याच्या झेंड्यावर पंढरपूर करणारे आम्ही नाही”, असं निलेश लंके म्हणाले.

“तुमच्या दडपशाही आणि दादागिरीला कोणी भीक घालणार नाही. तुमचे चमचे आणि तुम्ही येत्या 13 तारखेला घरी पोहोचल्याशिवाय राहणार नाहीत. आता सर्वसामान्यांनी शांत बसायला नको. मी सर्वसामान्य कुटुंबातील घरात जन्माला आलो. तुमच्या

पीएने तर 15 टक्क्याने पैसे गोळा केले. मला लोक विचारतात. तुम्हाला पीए कोण? मी सांगतो मीच माझा पीए. माझ्यात काही बदल झाला का?”, असं निलेश लंके म्हणाले.पारनेरकरांच्या अस्तित्वाची लढाई आहे, जर काही दगाफटका झाला तर सर्वसामान्यांच्या अस्तित्वात धक्का बसेल.

लोकसभेचा उमेदवार उत्तरेचा, मात्र मी तुमच्या घरातला आहे ना? त्यांना सांगा पैसे घेऊन जा. आता तुम्ही सर्वांनी पुढे या. कुठल्याही परिस्थितीत आपल्याला निवडणूक जिंकायची आहे. तुमच्याकडे पैसे तर आमच्याकडे लोक आहेत”, असं निलेश लंके म्हणाले.

“त्यांच्या बगलबच्चांना सांगा. तुझ्या साहेबाला फोन लाव मी माझ्या निलेश लंकेला फोन लावतो. आपण 365 दिवस काम करणारे माणसं. आम्हाला एकदा-दोनदा डिवचलं. मात्र आम्ही पण स्वाभिमान आहोत. मी माझ्या छातीवरचा वार घेऊ शकतो. मात्र कार्यकर्त्यांचे नाही. कोणी काही बोलू द्या. कमीत कमी दोन लाख मतांनी निवडून येणार.

शिवसेनेना आणि काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांना जाऊन भेटा, कोणी दुखावल गेले असती तर सांगा पदरात घ्या”, असं निलेश लंके म्हणाले.आज ते गोड गोड बोलतील. मात्र उद्या विचारणार देखील नाही. हे मोठे लोक आहे. पुन्हा पाच वर्ष ते फिरणार नाही. ते हिलेकॉप्टरमध्ये फिरतात. माझ्या गाडीचं डिझेल कार्यकर्ते टाकतात.

अनेक लोक म्हणतात आमचं पाकीट येऊ द्या. मग आम्ही तुमच्या तंबूत. निलेश लंके मॅनेज होणारी अवलाद नाहीय मॅनेज हा तुमचा शब्द. 4 तारखेला लोक सांगतील डॉन कोण”, असं निलेश लंके म्हणाले.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!