माय महाराष्ट्र न्यूज:लोकसभा निवडणुकीच्या या हंगामात सध्या मोठ्या राजकीय घडामोडी घडत आहेत. या निवडणुकीच्या वातावरणात कधी काय होईल हा अंदाज लावणं कठीण झालं आहे. राजकीय विश्लेषकांचेही काही अंदाज खोटे ठरत आहेत.
दरम्यान, हवामानाचा अचूक अंदाज सांगण्याची ज्यांची हातोटी आहे, असे पंजाबराव डख हेदेखील या निवडणुकीच्या आखाड्यात उतरले आहेत. ते परभणी लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.पंजाबराव डख हे परभणीतून लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत.
याबाबत खुद्द डख यांनीच अधिक माहिती दिली आहे. समाजमाध्यम तसेच अन्य माध्यमांतून पंजाब डख हे महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज सांगतात. त्यांनी सांगितलेला हा अंदाज अनेकवेळा अचूक ठरतो, असे शेतकऱ्यांना वाटते. म्हणूनच ते कमी काळात संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध झाले.
त्यानंतर आता त्यांनी लोकसभा निवडणूक लढवण्याचे ठरवले आहे. ते परभणीतून निवडणूक लढवणार आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ते अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.परभणीत जानकर विरुद्ध महाविकास आघाडीचा उमेदवार यांच्यात प्रमुख लढत होणार आहे. पण पंजाबराव
डख यांनीदेखील या मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा निश्चय व्यक्त केल्यामुळे हा मतदारसंघ चर्चेचा विषय ठरतोय. पंजाबराव डख यांच्या हवामानाचा अंदाज गंभीरपणे घेणारे शेतकरी, सामान्य लोक त्यांना निवडणुकीत मतदान करणार का? पंजाबराव डख यांचा विजयाचा अंदाज खरा ठरणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.