शेवगाव
लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या 94 व्या जयंतीनिमित्त शेवगाव येथे शेवगाव पाथर्डी मतदारसंघाचे माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील, अहमदनगर जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा सौ राजश्रीताई चंद्रशेखर घुले पाटील आणि शेवगाव पंचायत समितीचे सभापती डॉ. क्षितिज नरेंद्र घुले पाटील यांच्या शुभ हस्ते आजी माजी सैनिक, विरपत्नी, व विरमाता यांचा गौरव सोहळा आणि स्नेहभोजन कार्यक्रम पार पडला.
लष्करातील जवान हे देशाचे खरे हिरो आहेत ,आपल्या जीवाची आणि कुटुंबियांची पर्वा न करता ते कार्य करीत असतात ,समाजाने त्यांना सन्मान देण्याची गरज आहे ,सेवानिवृत्त होऊन देखील माजी सैनिक समाजसेवा करीत असून त्यांचे सामाजिक कार्य प्रेरणादायी आहेत, देशाच्या सुरक्षितेसाठी आपल्या जीवाची परवा न करता आपले वीर जवान सिमारेषेवर कोणत्याही संकटात सामना करण्यासाठी कायम सज्ज असतात, त्यांच्या या राष्ट्रभक्तीच्या भूमिकेत त्यांच्या आई, पत्नी व कुटुंबियांचाही मोठा वाटा असतो. अशा महान वीरपत्नी व वीरमाता यांचा सत्कार देखील यावेळी करण्यात आला
याप्रसंगी काकासाहेब नरवडे, संजय कोळगे, पंडीतराव भोसले,एकनाथ कसाळ, ताहेर पटेल, हनुमान पातकळ, विनोद शेळके, शिवाजी बडे, चंद्रकात घनवट, सर्जेराव घानमोडे, संतोष घुले, भक्तराज केदार, सुरेश आव्हाड, परशुराम पाचपुते,युवराज भोसले,संतोष पावसे, अभिजीत आहेर आदी उपस्थीत होते