नेवासा/सुखदेव फुलारी
“येळकोट येळकोट जय मल्हार”चा जयघोष करत धनगर समाजाला अनुसूचित जमाती (एसटी) आरक्षण लागू करा यामागणीसाठी सकल धनगर समाजाचे वतीने शनिवार दि. २१ रोजी नगर-छत्रपती संभाजीनगर महामार्गावर नेवासे फाटा ( त्रिमुर्तीनगर ) येथे रस्तारोको आंदोलन करण्यात आले. दरम्यान, आंदोलक शेकडो मेंढ्यांसह महामार्गावर महामार्ग तब्बल अर्धा तास ठप्प होता.
दरम्यान राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास उपोषणाच्या आठव्या दिवशी बुधवार दि.२४ रोजी गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेण्याचा इशारा ही अशोकराव कोळेकर यांच्यासह आंदोलकांनी दिला आहे.
धनगर समाजाला अनुसूचित
जमाती आरक्षण लागू व्हावे, यामागणीसाठी बुधवार दि.१८ रोजी पासून नेवासा फाटा येथे सकल धनगर समाजाचे वतीने राज्यव्यापी
आमरण उपोषणास महाराष्ट्र राज्य धनगर समाज आरक्षण कृती समितीचे जिल्हाध्यक्ष व भाजपचे उत्तर जिल्हा चिटणीस अशोक कोळेकर यांच्यासह प्रल्हाद सोरमारे, बाळासाहेब कोळसे, राजेंद्र तागड, देवीलाल मंडलिक, रामराव कोल्हे व भगवान भोजने यांच्या सहभागाने प्रारंभ झाला.
उपोषणाच्या चौथ्या दिवशी आरक्षणाच्या मुद्द्यावर सकल धनगर समाजाच्या वतीने रस्तारोको आंदोलन करण्यात आले. मंडलाधिकारी सरिता मुंडे यांनी आंदोलकांचे निवेदन स्विकारले. यावेळी पोलीस निरीक्षक धनंजय जाधव उपस्थित होते.
*बुधवारी गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेण्याचा इशारा…
दरम्यान राज्य सरकारने धनगर समाजाच्या आरक्षणाबाबत निर्णय न घेतल्यास उपोषणाच्या आठव्या दिवशी बुधवार दि.२४ रोजी गोदावरी नदीत उड्या टाकून सामुदायिक जलसमाधी घेण्याचा इशारा ही अशोकराव कोळेकर यांच्यासह आंदोलकांनी दिला आहे. या धनगर आरक्षणाच्या लढ्यास जिल्ह्यासह राज्यभरातून धनगर समाजाच्या विविध संघटनांनी उपोषणस्थळी येऊन उपोषणकर्त्यांची भेट घेत पाठिंबा दिला आहे.