नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा विधानसभा मतदार संघासाठी प्रवासी निरीक्षक म्हणून आलेले गुजरात गांधीनगरचे जिल्हाध्यक्ष नैलेश शहा यांनी नेवासा विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेतला.
श्री.शहा यांनी नेवासा विधानसभा मतदार संघातील शक्तिकेंद्र प्रमुख आणि बुथ प्रमुख तसेच प्रमुख पदाधिकारी यांच्यासह भेंडा, भानसहिवरे,कुकाणा,अंतरवाली, तरवडी,बेलपिंपळगाव, पाचेगाव, सुरेगाव,नेवासा बुद्रुक, बहिरवाडी, नेवासा शहर या ठिकाणी बैठक घेऊन संघटन मजबूत करण्यासंबंधी मार्गदर्शन केले.
तसेच त्यांनी देवगड येथे गुरुवर्य भास्करगिरीजी महाराज यांची भेट घेऊन दर्शन घेतले,तसेच श्रीक्षेत्र शनिशिंगणापुर येथे भेट देऊन अभिषेक केला,बहिरवाडी येथील कालभैरवनाथ देवस्थान व नेवासा येथील जैन मंदिर या ठिकाणी हि भेट देऊन दर्शन घेतले.
भाजपाचे जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव लंघे,माजी आ.बाळासाहेब मुरकुटे, नेवासा विधानसभा संयोजक सचिन देसरडा, जिल्हा उपाध्यक्ष पेचे, तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी,अण्णासाहेब गव्हाणे,डॉ. बाळासाहेब कोलते,अड. विश्वास काळे,प्रताप चिंधे, मनोज पारखे,ऋषिकेश शेटे, दादा गजरे, ऋषिकेश तागड, पिंटू वाघडकर,सतीश शिंदे, सोमनाथ कचरे,लक्ष्मणराव मोहिटे, मानव साळवे, देविदास साळुंके, पोपट शेकडे,चांगदेव दारूंटे, देविदास पटारे,रितेश भंडारी आदी यावेळी उपस्थित होते.भाजपाचे तालुकाध्यक्ष भाऊसाहेब फुलारी यांच्या भेंडा बुद्रुक येथील निवासस्थानी श्री.शहा यांनी भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला.