Monday, May 27, 2024

नगर जिल्ह्यात महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढणार! उमेदवारी न मिळाल्याने या नेत्या बंडखोरीच्या तयारीत?

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:महाविकास आघाडीमध्ये सांगली तसेच भिवंडीच्या जागेवरुन वाद सुरू आहे. अशातच आता शिर्डीमध्येही काँग्रेससह महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत. शिर्डीमधून शिवसेना ठाकरे गटाने उमेदवार

जाहीर केल्यानंतर काँग्रेसच्या नेत्या उत्कर्षा रूपवते यांनी नाराजी व्यक्त करत बंडखोरी करण्याचा इशारा दिला आहे.शिर्डी लोकसभेचा आणि रूपवते कुटुंबाचा इतिहास सर्वांना परिचित आहे. आमची तिसरी पिढी काँग्रेसमध्ये आहे त्यामुळे उमेदवारी मागितली. 2014 ला

वडिलांना उमेदवारी नाकारली. आता मविआने नवीन उमेदवार द्यावा अशी मागणी होती. युवक काँग्रेससाठी मी देशभर काम केलं. पक्षाने महिला आयोगात काम करण्याची संधी दिली. मात्र राजकारणात वारंवार डावललं जातंय,” अशी खंत उत्कर्षा रुपवते यांनी व्यक्त केली.

तसेच “शिर्डीत महाविकास आघाडीने (Mahavikas Aaghadi) दिलेल्या उमेदवाराबद्दल जनतेत रोष आहे. मविआने उमेदवाराबद्दल फेर विचार करावा. जिल्ह्यातून काँग्रेस हद्दपार होण्याची भिती आहे. काँग्रेसला मतदारसंघ सोडावा यासाठी आग्रही होतो. जागा

शिवसेनेला गेली मात्र उमेदवार चुकीचा दिला. सांगलीसाठी प्रयत्न होतो मग शिर्डीसाठी का नाही?” असा सवालही उत्कर्षा रुपवते यांनी उपस्थित केला आहे.प्रकाश आंबेडकरांची  भेट घेऊन माझे विचार मांडले. मात्र अद्याप त्यात पुढे काहीही झाले नाही. मी वंचितमध्ये प्रवेश केलेला नाही.

निवडणूक लढवण्यावर मी ठाम आहे. मविआ ने जागेबाबत विचार करावा. ज्या पक्षाचा झेंडा घेऊन हिंडलो त्यांच्याकडून न्याय मिळत नसेल तर नाराजी व्यक्त करावी लागते,” असे म्हणत उत्कर्षा रुपवते यांनी

थेट बंडाचा इशारा दिला आहे. त्यामुळे आगामी काळात काँग्रेसची डोकेदुखी वाढण्याची चिन्हे दिसत आहेत.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!