Monday, May 27, 2024

महाराष्ट्रात मोठा राजकीय भूकंप:होय, मी भाजपमध्ये जातोय: हा बडा नेता राष्ट्रवादी सोडून पुन्हा स्वगृही परतणार 

IMG-20240425-WA0005
IMG-20240425-WA0005
previous arrow
next arrow
Shadow

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या पक्षाचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथ खडसे यांचा भारतीय जनता पक्षातील प्रवेश निश्चित झाला असून त्यांनीच आज याबाबत प्रसार माध्यमांना माहिती दिली आहे. एकनाथ खडसे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा होत होत्या. या चर्चांना आता त्यांनी पुर्णविराम दिला आहे.

आज त्यांनी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलताना आपण भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याचे स्पष्टपणे सांगितले आहे.लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्राच्या राजकारणाने आणखी एक धक्कादायक वळण घेतलं आहे. महाराष्ट्रातील दिग्गज नेते एकनाथ खडसे पुन्हा भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत.

स्वत: खडसेंनी आपल्या पक्षप्रवेशाची माहिती दिली आहे. लवकरच खडसेंच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त ठरणार असल्याची माहिती आहे. 8 एप्रिलला एकनाथ खडसेंचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे.भाजप प्रवेश झाल्यानंतर एकनाथ खडसेंना राज्यपालपद दिलं जाणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे.

खडसेंच्या भाजप प्रवेशाचा मुहूर्त आजच निश्चित होणार असल्याची माहिती आहे. भाजपमधील वरिष्ठ नेत्यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश होऊ शकतो. त्यानंतर पक्षाकडून खडसेंवर राज्यपालपदाची जबाबदारी सोपवली जाईल, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशाच्या चर्चा मागच्या अनेक दिवसांपासून सुरू होत्या. त्यातच

एकनाथ खडसे दिल्लीला गेल्यामुळे या चर्चांना आणखी उधाण आलं. मात्र आपण भाजप नेत्यांची भेट घेतली नसल्याचा दावा एकनाथ खडसेंनी केला. पण आता एकनाथ खडसे यांचा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची भेट घेतल्याचे फोटो समोर आले आहेत.

मला जर भाजपमध्ये यायचं असेल तर माझे वरिष्ठ पातळीवर मोदी, शहा, नड्डा यांच्याशी थेट संबंध आहेत, असं दिल्लीहून परतल्यानंतर एकनाथ खडसे म्हणाले होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!