Thursday, November 21, 2024

नगर जिल्ह्यातील विजय जाधव, गोविंद गोरे,नितीन डोलेंना शासनाकडून रेशीम रत्न पुरस्काराने सन्मानित तर विजय दळवी यांना उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

राहुल कोळसे: नेवासा:अहमदनगर जिल्ह्यातील तालुक्यातील राहुरी तालुक्यातील पाथरे येथील विजय जाधव यांना प्रथम, राहाता तालुक्यातील राजुरी येथील गोविंद गोरे यांना द्वितीय तर कोपरगाव तालुक्यातील नितीन डोले यांना तृतीय क्रमांक देत महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्त्रोद्योग मंत्रालयातर्फे ‘रेशीम रत्न’ पुरस्काराने तसेच अहमदनगर जिल्ह्याचे वरिष्ठ क्षेत्र सहायक विजय दळवींना उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देऊन नुकताच गौरव करण्यात आला आहे.

रेशीम संचालनालयाचे उपसंचालक डॉ. महेंद्र ढवळे यांच्या हस्ते त्यांना पुण्यात सदर पुरस्कार प्रदान झाला.रेशीम शेती व्यवसाय शेतीस पूरक व्यवसाय म्हणून न करता तो मुख्य व्यवसाय म्हणून करावा. रेशीम शेती हा शेतकऱ्यांच्या उत्पन्न वाढीसाठी शाश्वत पर्याय आहे. रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या अडीअचणी दूर होतील. शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन त्यांच्या जीवनात समृध्दी येईल त्यासाठी जास्तीतजास्त शेतकऱ्यांनी रेशीम शेती करावी असे आवाहन रेशीम संचालनालयाचे उपसंचालक महेंद्र ढवळे यांनी केले.

रेशीम संचालनालयाच्यावतीने देण्यात येणारे विभागस्तरीय रेशीम रत्न पुरस्कारांचे प्रदान यशस्वी रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना यशदा येथे आयेाजित कार्यक्रमात श्री.ढवळे यांच्याहस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी वस्त्रोद्योग विभागाच्या उपसचिव श्रद्धा कोचरेकर, प्रादेशिक रेशीम कार्यालयाच्या सहाय्यक संचालक कु.डॉ.कविता देशपांडे, कृषी विभागातील प्रक्रिया विभागाचे उपसंचालक सुनिल बोरकर, जिल्हा रेशीम विकास अधिकारी संजय फुले, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल पवार, अधीक्षक अविनाश खडसने यावेळी उपस्थित होते.

यावेळी मान्यवरांच्याहस्ते विभागात सर्वाधिक उत्पन्न घेतलेल्या रेशीम उत्पादक शेतकऱ्यांना रेशीम रत्न पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. पुरस्कारामध्ये प्रथम पुरस्कार रुपये अकरा हजार, द्वितीय साडे सात हजार, तृतीय पाच हजार तसेच शाल, साडी व प्रमाणपत्र असे स्वरुप होते. रेशीम संचालनालयातील उत्कृष्ट कार्य करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांना यावेळी प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.

 

[ वरिष्ठ क्षेत्र सहायक विजय दळवींना उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार

अहमदनगर जिल्ह्यातील वरिष्ठ क्षेत्र सहायक विजय दळवी यांना शासनामार्फत उत्कृष्ट कार्यासाठी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.नगर जिल्ह्यात विजय दळवी यांनी मोठ्या प्रमाणात मेहनत घेऊन शेतकऱ्यांचा बांधावर जात समस्या सोडवत नवीन शेतकऱ्यांना तुती लागवड व रेशीम उद्योग क्षेत्रात येण्यासाठी अहोरात्र मेहनत विजय दळवी घेत आहेत.त्यांची दखल घेत शासनाने गौरव केला आहे.]

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!