नेवासा
ब्रह्मदेवालाही लोक शिव्या शाप देतात, मी त्यातून कसा सुटणार. परंतु कितीही शिव्या शाप दिल्या तरी मी चांगले काम करण्याचे सोडणार नाही अशी ग्वाही आ.शंकरराव गडाख यांनी दिली.
नेवासा तालुक्यातील नजीक चिंचोली येथील खडेश्वर देवस्थान येथे मंगळवार दि.२४ सप्टेंबर रोजी विविध विकास कामे तसेच मंदिर परिसर सुशोभीकरण कामाचे उदघाटन आमदार शंकरराव गडाख व देवस्थानचे महंत गणेशानंदगिरीजी महाराज यांच्या हस्ते झाले त्यावेळी आ.गडाख बोलत होते. भांगचंद महाराज पाठक,उद्योजक शिवाजीराव पाठक, दत्तात्रय काळे ,भागचंद चावरे, भाऊसाहेब कडू, महादेव महाराज धाडगे, बाबुराव चावरे , काशिनाथ नवले, कुमार नवले, बाळासाहेब नवले, नामदेव निकम,ज्ञानेश्वर औताडे, सचिन नागवडे, बबनराव नागवडे, संजय नागवडे, ईश्वर पाठक, किशोर विधाटे, रंभाजी ब्राह्मणे, पप्पू भक्त, गोवर्धन काळे, संभाजी नवले, लक्ष्मण जाधव, कैलास धाडगे, संजय आढागळे, गोवर्धन पाठक, ज्ञानदेव गाडे, बाळासाहेब पाठक, कृष्णा महाराज धाडगे, बाबासाहेब चौगुले, अशोक चौगुले, दिगंबर पाठक, ग्रामसेवक श्री. कनरसाळे आदी यावेळी उपस्थित होते.
आ. गडाख पुढे म्हणाले की ,चिंचोली परिसराला लोकनेते स्व. मारुतीरावजी घुले पाटील साहेबांचा वारसा लाभलेला आहे. शेतकऱ्यांसाठी पावसाचा मोठा दिलासा आपल्या तालुक्याला मिळाला आहे. तसेच आपल्या परिसराला लाभदायक मुळा व जायकवाडी धरण ही भरले आहे. या धरणाच्या माध्यमातून पाट पाण्याचे नियोजन कसे करता येईल याचा माझा नेहमी प्रयत्न असणार आहे. उजवा कालव्यासाठी 75 कोटी रुपयांचा प्रस्ताव मंजूर केला होता. तसेच त्याची दुरुस्ती करून 30 दिवसांमध्येच रोटेशन सोडण्याचा माझा प्रयत्न होता. परंतु सरकारने निधी अडवल्यामुळे ते काम बंद झाले. त्या कामामुळे 30 दिवसांमध्येच नेवासा, शेवगाव, पाथर्डी, याचा लाभ मोठ्या प्रमाणात होणार होता. धरण 18 टीएमसी भरले तरी सुध्दा लाभ भेटणार होता परंतु सरकारने निधी थांबवल्यामुळे ते काम मी पुढे करू शकलो नाही .
विजेच्या बाबतीमध्ये 70 ते 75 हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव ही आपल्या नेवासा तालुक्यासाठी टाकला आहे तसेच विजेची उपलब्धता जास्त वीजेसाठी नवीन सबस्टेशन कसे तयार करता येईल याचाही प्रस्ताव मी टाकलेला आहे .तो प्रस्ताव मंजूर झाला तर वीस ते पंचवीस वर्ष विजेचा प्रश्न कायमचा सुटेल. हे दोनच प्रश्न महत्त्वाचे सुटले तर यातून तालुक्यात भरीव काम होणार आहे.
खंडेश्वरी देवस्थानचे महंत गणेशानंद गिरीजी महाराज म्हणाले की, गडाख कुटुंबीय ही नेहमी साधुसंतांचा आदर करणारे कुटुंब आहे. ते नेहमी धार्मिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असतात आमदार शंकरराव गडाख साहेबांच्या माध्यमातून चिंचोली विविध विकास कामे तसेच खडेश्वरी देवस्थान येथे सुशोभीकरणाचे काम होत असल्याने मोठा आनंद होत आहे . आमदार शंकरराव गडाख यांच्या माध्यमातून खडेश्वरी देवस्थान येथील झालेल्या सुशोभीकरण कामाचे मी मनापासून आभार मानत आहे.
उद्योजक शिवाजीराव पाठक म्हणाले की, आमदार शंकरराव गडाख यांच्या मागे आम्ही सर्वजण एकनिष्ठतेने उभे राहू व त्यांना पुन्हा एकदा आमदार करून नामदार केल्याशिवाय स्वस्त बसणार नाही.भागचंद महाराज पाठक यांनी प्रास्ताविक केले.