भेंडा/गुहा महाराष्ट्र राज्यातील कोतवाल संघटनेने कोतवाल कर्मचारी यांना चतुर्थ श्रेणी दर्जा देण्याची ऐतिहासीक मागणी व इतर मागण्या करीता पुकारलेल्या आंदोलन मध्ये सहभागी होण्या करीता दिनांक २४ सप्टेंबर २०२४ ला जिल्हास्तरावर धरणे आंदोलन दिनांक २५ सप्टेंबर २०२४ पासून राज्यभर कामबंद आंदोलन व दिनांक २६ सप्टेंबर २०२४ पासून आझाद मैदान, मुंबई मागण्या पूर्ण होई पर्यंत बेमुदत धरणे आंदोलन मध्ये राहुरी तालुका कोतवाल संघटना सहभागी होणार आहे या संदर्भात राहुरी तहसीलदार नामदेव पाटील यांना निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की कोतवाल पद हे ऐतिहासीक पद असून देखील मानधनावर काम करीत आहे. तरी महाराष्ट्र राज्यातील कोतवाल कर्मचारी संघटनेने पूकारलेल्या चतुर्थश्रेणी या ऐतिहासीक मागणी करीता राहुरी तहसिलदार संघटना महसूल कर्मचारी संघटना व तलाठी संघटना आम्हास न्याय मिळण्या करीता पाठींबा देतील अशी आमची मनोधारणा आहे. तरी राहुरी तहसिलदार यांना विंनती आहे की, आम्हा सर्व कोतवाल संवर्गा विषयी नक्कीच सहानुतीपुर्वक भुमिका असुन आमच्या मागण्या करीता लवकरात लवकर मंजुर करण्यात यावे अशी मागणी यावेळी करण्यात आली आहे.
कोतवाल यांना इ पीक पाहणी करणे, शेतकरी आत्महत्या माहिती गोळा करणे , शेतसारा माहिती, निवडणूक कामे, गावातील गौण खनिज माहिती, शेतसारा गोळा करणे , विविध शासन योजना माहिती देणे हे सर्व कामे कोतवाल यांना करावे लागतात म्हणून गुजरात व त्रिपुरा राज्यांप्रमाणे न्याय द्यावा अशी मागणी राहुरी तालुका तसेच राज्यातील कोतवाल संघटना यांनी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.
या निवेदनावर राहुरी कोतवाल संघटनेचे अध्यक्ष राधेश्याम मेहरे, रामनाथ अनाप, महेश देशमुख, प्रमोद ओहळ, दिपक मकासरे,जावेद शेख, योगेश झुगे, संजय पडघलमल, राजेंद्र पवार, सखाहरी इंगळे, राजीव चक्रनारायण , रामदास देशमुख, हरिभाऊ आघाव, चंद्रकांत विश्वासे, अशोक लाहुंडे, राजेंद्र वराळे, राजेंद्र गाडेकर आदींच्या निवेदनावर सह्या आहेत.