Sunday, October 6, 2024

नेवासा पोलिसांची १ ऑक्टोबर पासून वाहन तपासणी मोहीम 

नेवासा/सुखदेव फुलारी

१ ऑक्टोबर पासून नेवासा तालुक्यात विशेष वाहन तपासणी मोहीम राबविण्यात येणार असून तपासणी दरम्यान वाहना नंबर प्लेट नसणे किंवा
फॅन्सी नंबर प्लेट असणाऱ्या वाहनास
५०० ते ३००० रुपये दंड करण्यात येणार असल्याची माहिती पोलिस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.

याबाबत अधिक माहिती देतांना श्री.जाधव म्हणाले की, नेवासा पोलिस ठाण्याचे हद्दीत वाहन चोरी, घरफोडी यावर नियंत्रण मिळवण्यासाठी अचानक नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने १ ऑक्टोबर पासून वाहनांच्या नंबर प्लेटच्या अनुषंगाने स्पेशल ड्राईव्ह राबविण्यात येत आहे. तालुक्यातील वाहनांच्या नंबर प्लेट व कागदपत्रांची विशेष तपासणी मोहिमेचे आयोजन करण्यात येणार आहे.
म्हणून सर्व वाहनधारकांनी आपल्या वाहनाच्या नंबर प्लेट 30 सप्टेंबर 2024 या तारखे पर्यंत मोटर वाहन कायदा, नियमानुसार (नविन वाहन खरेदी करताना डीलरने दिली होती तशी) करून घ्याव्यात. फॅन्सी नंबर प्लेट किंवा नंबर प्लेट नसणे पहिल्या अपराधास ५०० रुपये,१००० रुपये,१५०० रुपये व पुढील अपराधास ३००० रूपये दंड आहे. तसेच सोबत वाहन चालवण्याचे ड्रायव्हिंग लायसंस (मूळ परवाना) आणि वाहनाच्या नोंदणीचे किमान प्रमाणित केलेले झेरॉक्स कागदपत्रे सोबत बाळगावें, अन्यथा पोलीस कारवाईला तोंड देण्याची वेळ येऊ शकते असे ही श्री.जाधव यांनी स्पष्ट केले.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!