नेवासा/प्रतिनिधी
नेवासा नगरपंचायतच्या माध्यमातून बाजारतळ येथे बांधण्यात आलेल्या व्यापारी संकुलातील हरकत नसलेले गाळे लिलाव धारकास हस्तांतरित करण्यात यावे व कोर्टातील प्रकरण नगरपंचायतने गांभीर्याने घेऊन त्वरित निकाल लावण्यासाठी तज्ञ वकिलांची नेमणूक करावी तोपर्यंत डिपॉजिट म्हणून भरलेले ५० हजार रुपये व्यापाऱ्यांना परत करण्यात यावे अशी मागणी भाजपचे युवा नेते मनोज पारखे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्याधिकारी यांच्याकडे केली आहे.
मुख्याधिकारी सोनाली म्हात्रे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की नेवासा नगरपंचायत च्या माध्यमातून कोठेवधी रुपये खर्चून बाजारतळ येथे व्यापारी संकुल बांधण्यात आले आहे दोन वर्षांपूर्वी या व्यापारी संकुलातील गाड्यांचा लिलाव करण्यात आला होता यामध्ये अनेक व्यापाऱ्यांनी आपली जमापुंजी एकत्र करून लिलाव प्रक्रियेत भाग घेतला होता अनेकांनी 50 हजार रुपये डिपॉझिट भरले होते यातील बहुतांश गाळ्यांचा लाखो रुपयांमध्ये लिलाव झाला होता परंतु काही व्यापाऱ्यांनी लिलाव प्रक्रियेस हरकत घेऊन न्यायालयामध्ये प्राधान्याने जुन्या व्यापाऱ्यांना गाळे देण्यात यावे यासाठी याचिका दाखल केली आहे प्रकरण कोर्टात गेल्याने व्यापारी संकुल धुळ खात पडले आहे व लिलाव प्रक्रियेत भाग घेतलेल्या व्यापाऱ्यांचे पैसे अडकले आहेत त्यामुळे हे व्यापारी हतबल झाले असून नगरपंचायतने कोर्टामध्ये सक्षमपणे बाजू न मांडल्याने वेळकाढू पणा झाला आहे यामध्ये नगरपंचायतचेच लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे अनेक होतकरू तरुणांनी मोठ्या कष्टाने या गाळ्यांसाठी पैसे लावलेले असल्यामुळे नगरपंचायतने न्यायालयामध्ये तज्ञ वकिलाची नेमणूक करून लवकरात लवकर व्यापारी संकुलाचा विषय मार्गी लावावा अशी मागणी उपस्थित व्यापाऱ्यांच्या वतीने करण्यात आली आहे यावेळी व्यापारी संतोष चांदणे, अराफत शेख, मंगेश नागरे, भारत शेंडे, आदिनाथ पटारे,सतीश गायके आदी उपस्थित होते