Saturday, December 21, 2024

नगर-छ.संभाजीनगर महामार्गावर टायर पेटवले;धनगर समाजाचे आंदोलकांवर गुन्हे दाखल

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा/प्रतिनिधी

गैरकायद्याची मंडळी एकत्र करुन संभाजीनगर ते अ.नगर जाणारे महामार्गावर मुकिंदपुर गावच्या शिवारात अशोका पॅलेस हॉटेल समोर चार टायर पेटवुन महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करुन जिल्हादंडाधिकारी यांचा प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी अशोक कोळेकर यांच्यासह धनगर समाजाच्या 15 आंदोलकांवर नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

याबाबत नेवासा पोलीस ठाण्यात नेमणूकिस असलेले पो.कॉ.नारायण एकनाथ डमाळे ( वय 35 वर्षे) यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीत म्हंटले आहे की, मी नेवासा पोलीस स्टेशनला तपास पथकात काम करतो. मागील 07 दिवसापासुन अ.नगर ते संभाजीनगर जाणारे हायवे रोडलगत नेवासा फाटा (मुकिंदपुर शिवार) येथे त्रिमुर्ती कॉलेज जवळ अशोक पॅलेस समोर धनगर समाजास अनुसुचित जमाती (एस टी) मध्ये समावेश व्हावा यासाठी उपोषण सुरु असुन सदर उपोषण हे अशोक नामदेव कोळेकर व विठ्ठल दादा खताळ यांच्या नेतृत्वाखाली चालु आहे. सदर आंदोलन ठिकाणी कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आवश्यक तो पोलीस बंदोबस्त असुन सदर आंदोलनकर्ते यांनी वाहतुकीस कुठलाही अडथळा करु नये तसेच उपोषणा दरम्यान कोणताही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवु नये म्हणुन दि. 25/09/2024 रोजी भारतीय न्याय संहिता कलम 168 प्रमाणे नोटीस दिलेली आहे.
दि. 25/09/2024 रोजी दुपारी 14:45 वाजेच्या सुमारास मी तसेच पोकॉ राहुल खंडागळे असे आंम्ही नेवासा फाटा येथे अ.नगर ते संभाजीनगर जाणारे हायवे रोड लगत त्रिमुर्ती कॉलेजच्या जवळ अशोका पैलेस हॉटेल समोर धनगर समाज उपोषण ठिकाणी कायदा सुव्यवस्था बंदोबस्त कामी ड्युटीस असताना उपोषणकर्ते अशोक नामदेव कोळेकर,अण्णासाहेब शेंडगे, राजेंद्र गणपत तागड, संभाजी भागीनाथ लोंढे,राहुल नजन, भगवान आसाराम भोजणे,साहेबराव देवकाते, सुनिल सोनवणे,शिवाजी कराडे, विठ्ठल दादा खताळ व ईतर तीन ते चार अनोळखी ईसम (नाव गाव माहीत नाही) लोकांनी गैरकायद्याची मंडळी जमवुन अ.नगर ते संभाजी नगर महामार्गावर चार टायर पेटविले. त्यामुळे हायवे रोडवर वाहतुक अडखळली आहे. त्यावरुन सदर ठिकाणी पो काँ आप्पासाहेब तांबे, पो काँ अवि वैद्य, पो काँ भारत बोडखे असे सर्वजण घटनास्थळी दाखल झाले, सदर हायवे रोड लगत पेटविलेले टायर बाजुला करुन वाहतुक सुरळित केली आहे.

तरी दि. 25/09/2024 रोजी दुपारी 14:45 वाजेच्या सुमारास धनगर समाजाथा अनुसुचित जमाती (एसटी) मध्ये समावेश व्हावा यासाठी चालु असलेले उपोषन व त्याचे नेतृत्व करत असलेले अशोक नामदेव कोळेकर, अण्णासाहेब शेंडगे, राजेंद्र गणपत तागड,संभाजी भागीनाथ लोंढे, रहुल नजन, भगवान आसाराम भोजणे साहेबराव देवकाते, सुनिल सोनवणे, शिवाजी कराडे, विठ्ठल दादा खताळ सर्व रा नेवासा व ईतर तीन ते चार अनोळखी ईसम (नाव गाव माहीत नाही) अशी गैरकायदयाची मंडळी एकत्र करुन त्यांनी संभाजीनगर ते अ.नगर जाणारे महामार्गावर मुकिंदपुर गावच्या शिवारात अशोका पॅलेस हॉटेल समोर चार टायर पेटवुन महामार्गावरील वाहतुकीस अडथळा निर्माण करुन जिल्हादंडाधिकारी यांचा जिल्ह्यात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी अ.नगर जिल्हा महसुल स्थळ सीमेच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 37 (1) (3) चे प्रतिबंधात्मक आदेश जारी असताना देखील त्याचे उल्लंघन केले आहे, तसेच पोलीस निरीक्षक नेवासा पोलीस स्टेशन यांनी सदरचे उपोषण कामी भारतीय न्याय संहिता कलम 168 प्रमाणे प्रतिबंधात्मक नोटीस बजावणी केली असताना देखील सदर नोटीसची अवज्ञा केली आहे. म्हणुन माझी वरील सर्व आंदोलकांविरुद्ध BNS 223, 189(2),126 (2) व महाराष्ट्र पोलीस अधिनीयम कलम 37 (1), 37(3), 135 प्रमाणे कायदेशिर फिर्याद आहे.

 

 

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!