श्रीरामपूर/गौरव डेंगळे
क्रीडा व युवक सेवा संचालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत,अहमदनगर क्रीडा कार्यालय व श्रीरामपूर तालुका क्रीडा संघटना यांच्या वतीने आयोजित मुलींच्या तालुकास्तरीय कबड्डी क्रीडा स्पर्धेत, तालुक्यातील १४,१७,१९ वर्षा आतील वयोगटांमध्ये ३० – ३५ शाळेच्या संघानी सहभाग नोंदविला.संत तेरेजा गर्ल्स हायस्कूलच्या १४,१७ वर्षातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावत दुहेरी मुकुट प्राप्त केला.
१४ वर्षा आतील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यामध्ये जा वा आदिक विद्यालय, खानापूर संघाला २७ – १० गुणांनी पराभूत करून जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी आपले स्थान पक्के केले.
या संघामध्ये गीतांजली बडाख,श्रुती कारले,कार्तिकी गायके,एंजल जाधव,पूर्वा बांद्रे,श्रद्धा चोरमल,क्रांती मंकाळे,अनुष्का देहाडे,मनस्वी पवार,सिमरन सय्यद,मनस्वी गायकवाड,हर्षदा चव्हाण या खेळाडूंनी ज्ञानदीपक कामगिरी करून संघाला विजय प्राप्त करून दिला.
१७ वर्षा आतील मुलींच्या संघाने अंतिम सामन्यांमध्ये जे टी एस विद्यालय व जुनिअर कॉलेज, बेलापूर संघाचा २८ – १० गुणांनी पराभूत केले.या संघामध्ये श्रावणी भांडण,सोनाली बेंद्रे,वैष्णवी गायके,आर्या कळसाईत,शर्वरी बोर्डे,तनुजा रोकडे,श्रावणी कहार,साक्षी बावस्कर,अनुष्का कसबे,शिफा शेख,अश्विनी फुलवर,स्नेहल गायकवाड या खेळाडूंचा सहभाग होता.शाळेच्या सन्माननीय मुख्याध्यापिका सिस्टर ज्योती यांनी दोन्ही संघांना शुभेच्छा दिल्या व भविष्यात आपल्या शाळेच्या खेळाडू हे भारताच्या कबड्डी संघामध्ये झळकतीन,अशी आशा व्यक्त केली.या दोन्ही यशस्वी विद्यार्थ्यांच्या संघांना प्रशिक्षक नितीन बलराज यांचे बहुमोल मार्गदर्शन लाभले.तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी विजयी खेळाडूंचे अभिनंदन केले व शुभेच्छा दिल्या.