नेवासा/प्रतिनिधी
समाजसेवेची निःस्वार्थी वृत्ती, आणि माणुसकीची भावना असलेल्या अब्दुल हाफिज शेख यांचं नाव आता फक्त स्थानिक पातळी पुरत मर्यादित नाही राहिलं. वयाच्या अल्पावधीतच त्यांनी आपल्या कार्याची चुणूक दाखवली आणि समाजात आदराचं स्थान निर्माण केलं आहे. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी ” भावा” सारखी जबाबदारी उचलत नेवासा विधानसभेसाठी जोरदार मोर्चेबांधणीचा चंग बांधला आहे. त्यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे आज नेवासा विधानसभा मतदारसंघात एक नव्या आशेची आणि बदलाची सुरुवात झाली आहे. याची नेवासा मतदार संघात जोरदार चर्चा सुरु आहे
*समाजासाठी झगडणारा, माणुसकीला आधार देणारा…*
अब्दुल हाफिज शेख यांची ओळख केवळ नेत्याच्या भूमिकेतून होत नाही, तर ते एका खऱ्या समाजसेवकाचं जिवंत उदाहरण आहेत. त्यांच्या कार्यशैलीत कधीच फक्त प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न नसतो. अब्दुल हाफिज शेख यांच्या मते, समाजाच्या सर्वात शेवटच्या घटकापर्यंत पोहोचणं हेच खऱ्या नेतृत्वाचं उद्दिष्ट असावं. त्यांनी केवळ चकाचक मंचांवर भाषणं देण्यापेक्षा सर्व मतदारसंघातील प्रत्येक कांना कोपऱ्यापर्यंत पोहचून मतदारसंघातील सर्वसामान्य माणसांच्या समस्या जाणून घेणं महत्वाचं मानलं आहे. त्यांनी मतदारसंघातील गांवा गांवा मध्ये जाऊन महिलांसाठी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या मोफत आरोग्य सेवा कार्ड त्याच बरोबर शासनाची ‘लाडकी बहिणा योजना’ सारख्या उपक्रमांची जागृतता केली कुकाणा गावा मध्ये मदत केंद्र उघडून जास्ती जास्त महिलांच्या पर्यंत आर्थिक मदत पोचवली. शिष्यवृत्तीच्या मंजुरीद्वारे ग्रामीण आणि शहरी भागातील विद्यार्थ्यांसाठी नवी स्वप्नं उभारण्याचा एक अद्भुत संधीचा मार्ग खुला केला. बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी प्रचंड निधी मिळवून, त्यांनी हजारो कुटुंबांना आर्थिक सुरक्षिततेचा मजबूत आधार दिला आहे. शेतकऱ्यांच्या समस्या असोत किंवा बेरोजगार तरुणांसाठी रोजगार निर्मितीची चळवळ अब्दुल हाफिज शेख यांचं हृदय नेहमीच समाजाच्या कल्याणासाठी धडधडतं. ते केवळ मदत करत नाहीत, तर प्रत्येक माणसाला जिंकून घेतात जिथं शब्द कमी, पण कृती अधिक प्रभावी असतात.
*जनतेच्या दिलाचा आवाज, जनता दरबार…*
अब्दुल हाफिज शेख यांची विशेषता म्हणजे त्यांनी समाजाशी संपर्क साधण्यासाठी सदैव दरवाजे खुले ठेवले आहेत. त्यांनी नियमितपणे “जनता दरबार” आयोजित करून जनतेच्या समस्या आणि अडचणींवर संवाद साधण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामुळे लोकांना आपले
माणसाला जिंकून घेतात जिथं शब्द कमी, पण कृती अधिक प्रभावी असतात.
*जनतेच्या दिलाचा आवाज, जनता दरबार…*
अब्दुल हाफिज शेख यांची विशेषता म्हणजे त्यांनी समाजाशी संपर्क साधण्यासाठी सदैव दरवाजे खुले ठेवले आहेत. त्यांनी नियमितपणे “जनता दरबार” आयोजित करून जनतेच्या समस्या आणि अडचणींवर संवाद साधण्याचा एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे. ज्यामुळे लोकांना आपले
विचार आणि भावना व्यक्त करण्यासाठी एक सुरक्षित वातावरण मिळत आहे. अब्दुल हाफिज शेख यांच्या मार्गदर्शनाने त्यांचे प्रश्न सोडवण्यात मदत मिळवली आहे. या संवादातून त्यांच समाजप्रेम स्पष्ट होते, ज्यामुळे लोकांना विश्वास वाटतो की त्यांचा हा एकमेव प्रतिनिधी त्यांच्यासाठी नेहमी तत्पर आहे..
*परिवाराची साथ…*
अब्दुल हाफिज शेख यांना त्यांच्या परिवाराची अखंड साथ आहे. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना समाजासाठी काम करण्याची शिकवण दिली. त्यांच्या आई-वडिलांसह त्यांच्या सौभाग्यवतीनी देखील समाजकार्याच्या प्रत्येक टप्प्यावर त्यांना साथ देत आहेत.
*परिवर्तनाच वार…*
आज अब्दुल हाफिज शेख यांच्या प्रेरणादायी कार्यामुळे नेवासा विधानसभा मतदारसंघात एक नवा आशावाद आणि परिवर्तनाच जोरदार वार वाहू लागल आहे. त्यांच्या सामाजिक कार्याच्या माध्यमातून त्यांनी लोकांना एकत्रित केले आहे, शेख यांची नेतृत्वशक्ती आणि सक्रिय सहभागामुळे समाजातील दुर्बल घटकांना आवश्यक ती मदत मिळत आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून आणले जात आहेत. अब्दुल हाफिज शेख यांची यांच्या कार्याने ही लाट जनतेला एकत्र आणली आहे, जिच्यात आशा, एकता आणि प्रगतीचा एक नवा संदेश आहे.
अब्दुल हाफिज शेख यांचा हा प्रवास ज्यात प्रत्येक पाऊल समाजाच्या विकासाच्या दिशेने आहे. त्यांची निस्वार्थी सेवा आणि कार्यप्रवृत्ती यामुळे नेवासा विधानसभा मतदारसंघात एक नवा इतिहास घडत आहे. लोकांची समस्या समजून घेऊन, त्यांच्यासाठी सोडवणूक करण्याचे धाडस दाखवणारे अब्दुल हाफिज शेख आजच्या काळातील योग्य नेतृत्व आहे.