नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा तालुक्यातील चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठाणच्या वतीने गत अकरा वर्षापासुन विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणा-या व्यक्तीनां देण्यात येणारे या वर्षीचे ज्ञानसरिता पुरस्कार जाहिर करण्यात आले असल्याची माहिती प्रतिष्ठाणचे अध्यक्ष चंद्रकांत कांबळे यांनी दिली.
जाहिर झालेल्या ज्ञानसरिता पुरस्काराचे मानकरी असे..
चिलेखनवाडीचे लोकनियुक्त सरपंच भाऊसाहेब सावंत (विशेष गौरव पुरस्कार), सुदाम देशमुख,अ.नगर (आदर्श पत्रकारिता पुरस्कार),सौ.मनिषा धानापुणे,भेंडा(क्रीडारत्न पुरस्कार), श्रीमती विद्या जोशी, अ.नगर (कलाभूषण पुरस्कार), श्रीमती अरिफा मिराबक्ष शेख (साहित्यरत्न पुरस्कार), सरपंच पुजा आघाव,हंडीनिमगाव (आदर्श सरपंच),स्नेहल संतोष भालेराव,अ.नगर (उत्कृष्ट अभियंता पुरस्कार),महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे अध्यक्ष शांताराम राऊत,अ.नगर (समाजभूषण पुरस्कार),प्रा.सागर बनसोडे (शिक्षकरत्न पुरस्कार),योगगुरु काकासाहेब फोलाणे (समाजकार्य पुरस्कार),अतुल तांबे,तांबेवाडी (कृषीरत्न पुरस्कार), शंकरराव कन्हेरकर (वृक्षमित्र पुरस्कार), अनिल चिंधे,माळी चिंचोरा(उत्कृष्ठ साहित्य लेखन पुरस्कार).
सन्मानचिन्ह, सन्मानपत्र , शाल व पुष्पगुच्छ असे या पुरस्काराचे स्वरूप असुन रविवार दि.२९ सप्टेंबर रोजी दुपारी २ वाजता श्रीराम साधना आश्रम मुकींदपूर (नेवासा फाटा ) येथे महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते व ज्येष्ठ साहित्यीक, विचारवंत सुभाष सोनवणे, ॲड. हिंमतसिंह देशमुख, युवा नेते अब्दुलभाई शेख, अशोक पाटील , बजरंग पुरी, आदि मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण करण्यात येणार आहे असे प्रतिष्ठाणचे उपाध्यक्ष प्रा.डॉ. संतोष तागड व सचिव प्रा. सुनिल पंडित यांनी सांगितले.
पुरस्कार वितरण सोहळ्यास उपस्थित रहाण्याचे आवाहन नितेश पठारे, रविंद्र कांबळे, अश्विनी थोरात यांनी केले आहे .
*जिल्हास्तरिय निबंध स्पर्धेत अश्विनी धुमाळ प्रथम तर साधना कुकडे द्वितीय*
चिलेखनवाडी येथील युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठानच्या वतीने घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय निबंध लेखन स्पर्धेत अश्विनी प्रसन्न धुमाळ यांना प्रथम क्रमांक तर अ.नगरच्या साधना प्रसाद कुकडे यांना द्वीतीय क्रमांक मिळाला आहे.
दि.२९ सप्टेंबर रोजी महंत सुनिलगिरीजी महाराज यांच्या शुभ हस्ते विजेतेत्या स्पर्धाकाना बक्षीस वितरण करण्यात येणार आहे.