नेवासा
नेवासा पंचायत समिती येथे लोकसेवक सरपंच संघटनेच्या झालेल्या बैठकीमध्ये नेवासा तालुक्यामध्ये आदर्श उपक्रम राबवत असलेल्या सौंदाळा ग्रामपंचायतचे लोकनियुक्त सरपंच शरद आरगडे यांची तालुकाध्यक्ष पदी सर्वानुमते निवड करण्यात आली.
आदर्श गाव वडुलेचे सरपंच दिनकर गर्जे यांनी नेवासा तालुका सरपंच संघटनेचे अध्यक्ष पदाभार सोडल्याने रिक्त झालेल्या तालुकाध्यक्षपदी आज निवड करण्यात आली.
सरपंच संघटनेच्या या बैठकीला नामदेव निकम, वैभव नवले, प्रमोद गजभार, चिलेखनवाडीचे सरपंच भाऊसाहेब सावंत, भिवाजी आघाव, पोपट हजारे, किशोर शिरसाठ, महादेव दराडे, प्रकाश सोनटक्के, कृष्णा शिंदे,कल्याण उभेदळ, ज्ञानेश्वर औताडे, राजेंद्र पंडित, संजय दरंदले, नवनाथ काळे, विष्णूपंत गायकवाड, संभाजी काळे, घोगरगावचे श्री गारूळे आदी हजर होते
गटविकास अधिकारी संजय लखवाल यांनी नवनियुक्त अध्यक्ष शरद आरगडे व माजी अध्यक्ष दिनकर गर्जे यांचा सत्कार करून अभिनंदन केले.