Saturday, December 21, 2024

भानसहिवरा परिसरात नियमित सिंगल फेज विजेसाठी आत्मदहन आंदोलनाचा इशारा

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

नेवासा

नेवासा तालुक्यातील भानसहिवरे येथील वाडया वस्तीवर रहाणाऱ्या नागरिकांना गावठाण प्रमाणे अक्षय प्रकाश योजना त्वरित सुरू न केल्यास नागरिकांच्या वतीने सामुदायिक आत्मदहन आंदोलन करण्याचा इशारा भारतीय जनता पक्षाचे नेवासा तालुका सरचिटणीस तथा जाणता राजा सामाजिक प्रतिष्ठाणचे संस्थापक अध्यक्ष लक्ष्मणराव मोहिटे यांनी प्रशासनाला दिला आहे.

या संदर्भात लक्ष्मणराव मोहिटे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने तहसीलदार, उपकार्यकारी अभियंता महावितरण यांना आत्मदहन आंदोलना संदर्भात निवेदन दिले.निवेदनात म्हटले आहे की, वाड्या वस्तीवर रहाणाऱ्या नागरिक, विद्यार्थी यांना विजे अभावी अतिशय त्रास सहन करावा लागत आहे.नागरिकांची अनेक दिवसांपासून मागणी आहे.अनेक निवेदने दिली आहेत तरी पण अद्याप कोणतीही दखल घेतली नाही.आता नागरिकांच्या सहनशिलतेचा अंत झाला असून दि. ६ आक्टोबर २०२४ पर्यत योजना सुरू न झाल्यास सोमवार दि. ७ आक्टोबर रोजी भानसहिवरे ता.नेवासा येथील बाजार तळावर नागरिकांच्या वतीने सामुदायिक आत्मदहन करणार आहे असा इशारा भाजपचे तालुका सरचिटणीस लक्ष्मणराव मोहिटे यांनी नागरिकांच्या वतीने प्रशासनाला दिला आहे.
निवेदन देते वेळी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष ज्ञानेश्वर पेचे, बाळासाहेब क्षिरसागर, भाजपा अनुसूचित जाती मोर्चाचे तालुका उपाध्यक्ष मानव साळवे, देविदास पटारे, चांगदेव दारूंटे, संभाजी भणगे, गणेश टाके,शाहुल मकासरे, शशिकांत बेहळे, फिलीप मकासरे, डोईफोडे यांचेसह शेतकरी नागरिक उपस्थित होते.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!