नेवासा
नेवासा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोडेगाव येथील उप आवारात कांदा भाव स्थिर राहिले आसुन आवारात प्रथमच नवीन लाल कांद्याची आवक झाल्याने कांदा गोण्यांना नारळ वाढवून लीलाव करण्यात आला.
घोडेगाव कांदा उपवारात बुधवार दि.२५ रोजी झालेल्या कांदा लिलावात कांद्याला सरासरी ४५०० ते ४८०० रुपये भाव मिळाला एक-दोन लाॅटला ५००० ते ५२०० रुपयेचा भाव मिळाला.
या वर्षात प्रथमच पांडुरंग होंडे यांच्या साक्षी ट्रेडिंग कांदा अडतीवर लाल कांद्याची आवक झाल्याने कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष नंदकुमार पाटील संचालक रमेश मोटे तसेच उपवाराचे शाखाधिकारी संभाजी भवारयांच्या हस्ते नारळ वाढवून कांद्याचा लिलाव करण्यात आला.
बुधवार रोजी एकूण ३४ हजार १४१ गोण्यांची आवक आली होती यात एक दोन लाॅटला ५००० ते ५२०० तर मोठा कांदा ४७०० ते ५०००
मुक्कल भारी ४५०० ते ४८००
गोल्टा ४७०० ते ४९०००
गोल्टी ४४०० ते ४७०० तसेच
हल्का डंकी जोड कांदा २००० ते ३५०० रुपये भाव मिळाला .
सरकारच्या दुटप्पी धोरणाचा शेतकऱ्यांना फटका…
एकीकडे केंद्र सरकारने निर्यात शुल्क ४० हुन २० टक्के केलं आसल तरी दुसरीकडे अफगाणिस्तानहुन आयात केलेला कांदा निशुल्क बाजारात विक्रीस येत असल्यामुळे त्याचा परिणाम भावावर झाला आहे. सरकारच्या या दुटप्पी धोरणामुळे शेतकऱ्यांना फटका बसत आहे
-पांडुरंग होंडे
कांदा आडतदार घोडेगाव