Saturday, December 21, 2024

विदेशी नागरिकांनी आरणगाव येथे खरेदी केलेल्या जमिनीचे खरेदीखत व फेर रद्द

WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
WhatsApp Image 2024-11-15 at 7.50.47 PM
previous arrow
next arrow
Shadow

अहमदनगर/प्रतिनिधी

परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनी
मौजे अरणगाव ता. नगर येथील खरेदी केलेल्या जमीनीचे फेरफार क्र.५७८१,६९६२ व ५६२५ रद्द करण्याचे आदेश नगरच्या तहसीलदारांनी दिले असल्याची माहिती या प्रकरणातिल तक्रारदार माहिती अधिकार कार्यकर्ते काकासाहेब गायके पाटील यांनी दिली.

याबाबत दिलेल्या आदेशात नगरचे तहसीलदार यांनी म्हंटले आहे की,मौजे अरणगाव ता. नगर येथील ग.नं. ५४८ मधील सन २०१५ व २०१६ मध्ये दोन परदेशी नागरिकत्व असलेल्या व्यक्तींनी खरेदी केल्यां प्रकरणी श्री. काकापाटील बाजीराव गायके मु.रांजणी पो. दहिगाव-ने ता. शेवागाव यांचा अर्ज या कार्यालयास प्राप्त झालेला होता. त्यानुसार सदर अर्जात नमूद मुद्द्याबाबत चौकशी करून अहवाल जिल्हाधिकारी कार्यालय अहमदनगर कुळकायदा शाखा यांना सादर केलेला होता. त्यानंतर मौजे अरणगाव ता. नगर येथील फेरफार क्र.
५७८१,६९६२ व ५६२५ चे पुनर्विलोकन होणे बाबतचा प्रस्ताव उपविभागीय अधिकारी नगर भाग,अहमदनगर यांचेकडेस सादर केलेला होता. त्या अनुषंगाने उपविभागीय अधिकारी यानी मौजे अरणगाव ता. नगर येथील फेरफार क्र. ५७८१,६९६२ व ५६२५ चे पुनर्विलोकनास मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यानुसार वादी, प्रतिवादी यांना त्यांचे म्हणणे देणेकामी वेळोवेळी संधी देण्यात आलेली नाहे.
प्रस्तुत अहवालाच्या अनुषंगाने व संचिकेत उपलब्ध असलेल्या कागदपत्राचे आधारे असे दिसून येते है, श्री लक्ष्मण नरहरी पुंड रा. अरणगाव यांनी दि. १३/१०/२००८ रोजी मोजे अरणगाव ता. नगर येथील गट नंबर ५४८/१/२ प्लॉट नं १ मधील ९३०.५२ चौ.मी हे क्षेत्र गॅरी क्लायनर यांना दस्त क्रमांक ४७८४/२००८ अन्वये कायम खरेदी खताने दिलेली असून सदर खरेदीखताची नोंद फेरफार क्रमांक ४७०८ दि. २२/०५/२०११ जी तत्कालीन तलाठी यांनी गावी घेतलेली आहे व सदरची नोंद तत्कालीन मंडळाधिकरी वाळकी यांनी सन २०/२०१२ मधील आदेश दि. २३/०४/२०१३ रोजीच्या आदेशानुसार मंजूर केलेली आहे, त्यानंतर गरी स्न्यायनर यांनी मौजे अरणगाव ता. नगर येथील गट नं ५८८/४/२/३ मधील प्लॉट नं १ चे क्षेत्र श्री गपतराव म्हसुदेव बोठे यांना दस्त क्रमांक १३५२/२०१६ दि. ०३/०३/२०१६ रोजी कायम खरेदी खताने दिलेली आहे. तसेच फेरफार क्रमांक ५२१० दिनांक ०७/०८/२०१३ चे अवलोकन केले असता प्रल्हाद शशिकांत
जोशी व इतर १ यांनी मौजे अरणगाव येथील गट नं ५४८/९/२/३ क्षेत्र ५५० चौ. फूट ही मिळकत दस्त क्रमांक २१३४/२०१२ अन्वये ताकबयाशी मारीको यांना विक्री केल्याचे दिसून येते.

प्रकरणी प्रल्हाद शशिकांत जोशी यांनी मौजे अरणगाव येथील गट नंबर ५४८/१/२/३ मधील प्लॉट नं २ क्षेत्र ५९३० चोभी बर आधलेल्या मेहेर महाल या अपार्टमेन्ट मध्ये तळमजल्यावरील युनीट नं १ चे ५५०,०० चौ फुट ही मिळकत दस्त क्रमांक २१९७/२०१५ दिनांक ०६/०४/२०१५ अन्वये ऍमी सुझन वालीन यांना खरेदी खताने दिलेले आहे व त्यांची नोंद फेरफार क्रमांक ५६२५ दि. ०७/०५/२०१५ अन्वये गावी झालेली आहे असे दिसून येते. तरी फेरफार क्रमांक ५२९० व ५६२५ नुसार बिदेशी नागरिकांनी विषयांकित प्लॉटची विना परवानगी खरेदीखत केलेले असून त्याबाबत कुठलेही परवानगी घेतलेली दिसून येत नाही.

तसेच खातेदार गॅरी क्लायनर यांनी मौजे अरणगाव ता. नगर येथील ग.नं. 548/1/2/3 प्लॉट नं. 1 क्षेत्र 465.2600 हे.आर.चौ. मी. ही मिळकत गणपतराव म्हसुदेव बोठे यांना दि. 03/03/2016 रोजी खरेदी खताने विकत दिल्याचे दिसून येते व याबाबत गावी फेरफार क्र. 5781 दि. 13/05/2016 रोजी नोंद घेतल्याचे दिसून येते तसेच खातेदार लता अनुप चोपडा यानी मौजे अरणगाव ता. नगर येथील ग.नं. 547/2 एकूण बिनशेती क्षेत्र 21.892850 आर.चौ.मी. पैकी 7.5666 चौ.मी. व ऐमि सुझन वालिन यांनी मौजे अरणगाव ता नगर येथील ग.नं. 548/1/2/3 प्लॉट नं. 2 क्षेत्र 5.13 आर.चौ.मी. या मिळकती दस्त क्र. 3545/2019 दि. 08/07/2019 अन्वये अदलाबदनी लेख लिहून दिल्याने गावी फेर फार क्र.6962 दि. 01/02/2021 अन्वये नोंद झाल्याचे दिसून येते.
उपरोक्त सर्व कागदपत्रांचे अवलोकन केले असता उपविभागीय अधिकारी नगर भाग अहमदनगर यांचे कडील उपरोक्त नमूद आदेशा अन्वये मौजे अरणगाव ता. नगर येथील फेरफार क्र. 5781, 6962 व 5625 रद्द करण्यात येत आहे असे आदेश दिले असून तलाठी अरणगाव यांना
7/12 दुरुस्तीबाबत कार्यवाही करावी असे ही या आदेशा म्हंटले आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!