नेवासा/सुखदेव फुलारी
नेवासा फाटा येथे सूरु अलसेल्या धनगर आरक्षण आंदोलनातील दोन आंदोलकांनी गुरुवार दि.२६ रोजी प्रवरा संगम येथील गोदावरी नदित जलसमाधी घेतल्याचा संशय असलेले दोन आंदोलक झोपलेल्या आवस्थेत जिवंत मिळून आले असल्याची माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी दिली.
याबाबद अधिक माहिती अशी की,धनगर समाजाला एसटी प्रवर्गातून आरक्षण मिळावे या मागणीसाठी
मागील 9 दिवसापासून नेवासा फाटा येथे सूरु असलेल्यां आंदोलनास धनगर समाजाचे 6 आंदोलके उपोषणासाठी बसले होते.
त्यामधील बाळासाहेब कोळसे रा. आडगाव ता. पाथर्डी व प्रल्हाद चोरमारे रा. छ.संभाजीनगर यांनी प्रातर्विधीला जावून येतो असे सांगुन उपोषण स्थळावरून निघून गेले व धनगर समाजाच्या एका कार्यकर्त्याला फोन केला की “आम्ही जलसमाधी घेत आहोत, तुम्हाला शेवटचा जय मल्हार” असे सांगून फोन बंद केला. ही माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव हे फौज फाट्यासह प्रवरासंगम येथील पुलावर पोचहले.त्यांच्या पाठोपाठ तहसीलदार संजय बिरादार व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनिल पाटील, प्रांत सुधीर पाटील धनगर समाजाचे नेते अशोक कोळेकर हे ही घटना स्थळी पोहचले.
गोदावरी पुलावर प्रल्हाद चोरमारे यांची कार उभी असून कारच्या डॅश बोर्डवर चिठ्ठी लिहून ठेवली असून स्वतःचे मोबाईल सीटवर ठेवलेले आहेत. गाडी लॉक केलेली आढळून आली. कोळसे व चोरमारे यांचा पाण्यामध्ये शोध घेण्याचे कार्य सूरु आहे. शोध कार्यासाठी एडीआरएफ ची तूकडी बोलविन्यात आली होती.काल दिवस भर आणि रात्रि ही शोध घेऊन ही दोघे न सापडल्याने मोठा पेच निर्माण झाला होता.आंदोलकांनी उडी मारली अशी माहिती मिळाल्यानंतर नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी ही सूचना स्थानिक मच्छीमारांना देऊन अशी काही दुर्घटना दिसून आल्यास कळवण्याचे आवाहन करण्यात आले होते. त्याप्रमाणे स्थानिक मच्छीमारांनी ही माहिती पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांना दिली.
त्यानुसार आज शुक्रवार दि.२७ रोजी सकाळी
प्रवरा संगम पूलापासून खाली साधारण २ किलोमीटर अंतरावर आंदोलक झोपलेल्या आवस्थेत मिळून आले आहेत.
प्रत्यक्षदर्शीच्या मासेमारी करणाऱ्याच्या सांगण्यानुसार दोघे चालत-चालत येऊन चप्पुवर झोपले आहेत. तसेच आज सकाळी रामराव कोल्हे रा. कारला, ता. जि. जालना नावाचा आंदोलन गायब झाला होता, त्याला देखील पुलावर फिरताना देखील ताब्यात घेतले आहे असे ही पोनि धनंजय जाधव यानी सांगितले.