Sunday, October 6, 2024

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक राज्यभर वाढविणार-मा. आ.चंद्रशेखर घुले पाटील

शेवगाव/प्रतिनिधी

शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीचा नावलौकिक राज्यभर वाढविणार असल्याची ग्वाही माजी आ.चंद्रशेखर घुले पाटील यांनी दिली.

माजी आमदार नरेंद्र घुले पाटील व माजी आमदार चंद्रशेखर घुले पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असणाऱ्या शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समितीची वार्षिक सर्वसाधारण सभा आज दि.२८ रोजी खेळीमेळीच्या वातावरणात पार पडली.त्यावेळी मार्गदर्शन करताना श्री.घुले बोलत होते.
काकासाहेब नरवडे पाटील,संजय कोळगे, संजय फडके,ताहेर पटेल बाजार समितीचे सभापती एकनाथराव कसाळ, उपसभापती गणेशराव खंबरे , बबनराव भुसारी, अंबादास कळमकर , डॉ.सुधाकर लांडे,नाना मडके अशोकराव मेरड, अशोकराव धस,जमीरभाई पटेल, हनुमान पातकळ, रामजी अंधारे,राहुल बेडके,अरूणराव घाडगे,जाकीर कुरेशी, प्रदीपराव काळे, मनोज तिवारी, मंगेश थोरात, संतोष पावसे, राम सारडा,नारायण खेडकर, पुरुषोत्तम धुत,पुरुषोत्तम बिहाणी, नाथा ढाकणे, विठ्ठल थोरात, बंडु खांबट, अशोक जाधव, सखाराम आमले, नवनाथ रेवडकर गणेश इथापे व सर्व संचालक यावेळी उपस्थित होते.
कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती एकनाथराव कसाळ यांनी प्रस्ताविक करून अहवाल वाचन केले.चालू आर्थिक आर्थिक वर्षामध्ये 67 लाख रुपयांचा नफा झाल्याचे त्यांनी सांगितले.

सभेच्या सुरुवातीला अहवाल सालातील दिवंगतांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
शेवगाव कृषी उत्पन्न बाजार समिती येथील हमाल बांधव शजालिंदर रेवडकर, नवनाथ लव्हाट,सचिन म्हस्के,गणेश म्हस्के, गणेश इथापे यांनी हसनापूर येथील शेतकरी श्री ढाकणे यांच्या भुसारमालात आलेले साडेतीन तोळे सोने परत केल्याबद्दल या सर्व हमाल बांधवांचा सत्कार करण्यात आला.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!