भेंडा/नेवासा
माहिती अधिकाराचा योग्य वापर केल्यास शासकीय कार्यालयातील पारदर्शकता वाढून भ्रष्टाचाराला आळा बसू शकतो तसेच माहिती अधिकार कायद्यामुळे लोकशाही बळकट होते असे विचार प्रा. नानासाहेब खराडे यांनी व्यक्त केले .
भेंडा येथील श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेच्या जिजामाता माध्यमिक-उच्च माध्यमिक विद्यालय व जिजामाता पब्लिक स्कूल मध्ये दि.२८ सप्टेंबर रोजी आंतरराष्ट्रीय माहिती अधिकार दिनानिमित्त आयोजित
व्याख्याना प्रसंगी प्रा.खराडे बोलत होते.
शिक्षण संस्थेचे प्रशासकीय अधिकारी प्रा. भारत वाबळे , जिजामाता विद्यालयाच्या प्राचार्या डॉ.जयश्री पवार ,उपप्राचार्य शिरीष विधाटे ,पर्यवेक्षक शिवाजी मुंगसे,गोरक्षनाथ पाठक , सुधाकर नवथर , संतोष सोनवणे , पब्लिक स्कूलचे प्राचार्य
डॉ.राजेंद्र गवळी,उपप्राचार्य दिपक राऊत,
शिक्षिका राणी स्वामी, रेखा तरटे यांचेसह जिजामाता माध्यमिक व उच्च माध्यामिक विदयालय तसेच जिजामाता पब्लिक स्कूल येथील शिक्षक वृंद विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते .
जिजामाता विद्यालयात माहिती अधिकार दिनाच्या अंतर्गत विद्यालयांमध्ये वेगवेगळ्या स्पर्धा घेण्यात आल्या यामध्ये वकृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा, चर्चासत्रचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेमध्ये कु.पालवे तेजस्विनी जयसिंग, कु. वाळुंजकर आराध्या आदिनाथ, कु. आरगडे प्रियांका लक्ष्मण यांनी प्रथम क्रमांक मिळवला तर कु.कोलते वैष्णवी दत्तात्रय, कु. खाटीक किरण पांडुरंग, कु.बोरुडे पूर्वा वसंत यांनी द्वितीय क्रमांक पटकावला तर जाधव शुभम श्रीरंग, कु. आरगडे पूजा रामदास, कु. भोसले सृष्टी वैभव यांनी तृतीय क्रमांक मिळवला.
जिजामाता पब्लिक स्कूल मधील विद्यार्थ्यांना माहिती अधिकारावर विचारलेल्या प्रश्नांवर नम्रता नवले व आरुष चंदन यांनी अचूक उत्तरे दिली. कुमारी आलीया पठाण हिने “हे मेरे वतन के लोगो” हे गीत सादर केले.सृष्टी आसने व दीपिका तरटे या विद्यार्थिनींची भाषणे झाली.