नेवासा
माहितीचा अधिकार कायदा पारदर्शक राज्य कारभार चालावा या उदेदेशाने केला असुन व्यापक जनहितासाठी त्याचा वापर होणे अपेक्षित आहे असे कारभारी गरड म्हणाले.
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक मुकुंदराव पाटील माध्यमिक विद्यालयात दि. २८ सप्टेंबर माहितीचा अधिकार दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्याख्याते म्हणुन कारभारी गरड बोलत होते. संस्थेचे सचिव उत्तमराव पाटील अध्यक्षस्थानी होते.विद्यालयाचे मुख्याध्यापक सावता गायकवाड , सर्व शिक्षक कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
श्री.गरड यांनी माहितीचा अधिकार व त्याचे सखोल मार्गदर्शन विद्यार्थ्यांना केले .त्याचबरोबर गाव, तालुका ,जिल्हा, राज्य व केंद्रशासन यांच्या कार्यालयात या कायद्याचा कसा सुयोग्य वापर केला पाहिजे याची माहिती विद्यार्थ्यांना दिली . तसेच एकल पालकत्वची बालसंगोपन योजनेची माहिती विद्यार्थ्यांना करून दिली.