Sunday, October 6, 2024

नगर जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी या आमदारांचे भावी मुख्यमंत्री म्हणून झळकले बॅनर्स, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी काल जामखेड तालुक्यातील खर्डा येथे विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि लोकार्पण सोहळ्यात आगामी काळात रोहित पवार हे मंत्री असतील असे सूचक वक्तव्य केलं.

यानंतर आज नाशिकसह अनेक ठिकाणी रोहित पवारांचे ‘भावी मुख्यमंत्री’ म्हणून बॅनर्स झळकले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विधानसभा निवडणुकीचे वेध लागताच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. महायुती आणि महाविकास आघाडीकडून राज्यभरात मेळावे आणि सभा

घेतल्या जात आहे. तर गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत मुख्यमंत्रि‍पदाचा चेहरा कोण असणार? याबाबत चर्चा सुरु आहे. याआधी महाराष्ट्रातील अनेक नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असा आशयाचे बॅनर झळकले आहेत. आता रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने या बॅनरची जोरदार चर्चा रंगली आहे. आमदार रोहित पवार यांचा

आज वाढदिवस आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त नाशिकमध्ये भावी मुख्यमंत्री असे बॅनर लावण्यात आले आहे. नाशिक शहरात राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांनी हे बॅनर लावले आहे. तर राज्यातील अनेक ठिकाणी देखील रोहित पवारांचे बॅनर्स लागले आहेत. रोहितची पाच वर्ष तुमच्या सेवेसाठी आणि त्यानंतरची पुढची

वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी असेल, असे वक्तव्य शरद पवारांनी काल केले होते. यानंतर आज भावी मुख्यमंत्री म्हणून रोहित पवारांचे बॅनर झळकल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्रिपदाच्या शर्यतीत रोहित पवारांचेही नाव चर्चेत आल्याचे बोलले जात आहे.दरम्यान माझी पाच वर्षे आमदार म्हणून

गेल्यानंतर सत्तेचे एक नाही तर दुसरे ठिकाण हे मला मिळत गेलं. मी गृह खात्याचा राज्यमंत्री झालो, कृषी खात्याचा मंत्री झालो, सुरुवातीच्या काळात राज्यमंत्री राहिलो. वसंत दादांचा सरकार गेल्यानंतर मी स्वतःच मुख्यमंत्री झालो. केवळ एकदाच मुख्यमंत्री झालो नाही तर चार वेळेला मुख्यमंत्री झालो. रोहितची पाच वर्ष तुमच्या

सेवेसाठी आणि त्यानंतरची वर्ष महाराष्ट्राची सेवा करण्यासाठी”, असं म्हणत शरद पवार यांनी रोहित पवारांच्या आगामी मंत्रीपदाबाबत सूचक वक्तव्य केलं. विशेष म्हणजे “महाराष्ट्राची सेवा ही महाराष्ट्राच्या इतिहासात नोंद होईल अशी असेल”, असं वक्तव्य शरद पवारांनी केले. शरद पवारांनी स्वतःचा राज्यमंत्री ते मुख्यमंत्री

असा प्रवास सांगत एक प्रकारे रोहित पवार यांचा देखील मुख्यमंत्रीपदापर्यंतचा प्रवास तर सांगितला नाही ना? अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!