माय महाराष्ट्र न्यूज:राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांना सातत्याने टार्गेट केलं आहे. रोहित पवार हे अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. रोहित पवार हे शरद पवारांसोबत आहेत. रोहित पवार हे 2019 साली पहिल्यांदा कर्जत-जामखेडमधून निवडून विधानसभेवर गेले.
आता कर्जत-जामखेडमधून पुन्हा त्यांनाच मविआमधून तिकीट मिळण्याची शक्यता आहे. रोहित पवार अजित पवारांवर टीका करतात. त्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी
केली तर 50 टक्के शेण भरलेलं दिसेल” अशी खोचक टीका आमदार अमोल मिटकरीं यांनी रोहित पवारावर केली. “रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी केली तर 50 टक्के शेण भरलेलं दिसेल. त्यामुळेच ते बालिशप्रमाणे वक्तव्य करत आहेत” असं अमोल मिटकरी म्हणाले.रोहित पवारांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये.
आपण स्वतःची लायकी तपासावी, जातीय अहंकार अंगात भरलेल्या बालिश व्यक्तींनी अजित पवारांवर बोलू नये आणि अजित पवार यांच्यावर टीका करणे म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखे होय” असही आमदार मिटकरी म्हणाले आहेत. ‘रोहित पवारांनी तोंडाचा पट्टा हा त्यांच्या पक्ष वाढीसाठी चालवावा’ असा सल्लाही मिटकरींनी दिला आहे.