Sunday, October 6, 2024

खासदार लंके शाहांना म्हणाले तुमच्या या नेत्यांना पाडून आलो निलेश लंकेंनी सांगितला लोकसभेतील ‘तो’ किस्सा

माय महाराष्ट्र न्यूज. विधानसभा निवडणुकीसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी केली जात आहे. नेत्यांकडून राज्य पिंजून काढले जात असून ठिकठिकाणी सभा आणि मेळावे घेतले जात आहेत. या सभांच्या माध्यमातून

आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत. त्यातच आता अहमदनगर लोकसभा मतदारसंघाचे खासदार निलेश लंके यांनी संसदेत केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्या सोबतचा रंजक किस्सा पारनेरच्या सभेत सांगितला आहे.निलेश लंके म्हणाले की, मला विधानसभेचा अनुभव होता. मी लोकसभेत पहिल्यांदाच

पोहोचल्याने मी बिनधास्त होतो. माझ्यासोबत बीडचे बजरंग सोनवणे, दिंडोरीचे भास्कर भगरे आणि कल्याण काळे होते. तेवढ्यात संसदेच्या लॉबीत अमित शाह आले, असे त्यांनी म्हटले. यावेळी निलेश लंके यांच्या सोबत असणाऱ्या काही मंडळींनी अमित शाह यांच्यासोबत फोटो काढण्याचा आग्रह धरला होता.

त्यानंतर निलेश लंके यांनी पुढाकार घेतला आणि अमित शाह यांना आवाज दिला. ‘साहेब तुमच्यासोबत फोटो काढायचा आहे, असे निलेश लंके यांनी म्हटले. अमित शाह यांनी निलेश लंकेंना तत्काळ प्रतिसाद दिला आणि फोटो काढण्यासाठी बोलावले. यावेळी निलेश लंके यांनी त्यांच्या सहकाऱ्यांची ओळख करून देताना हे आपले बजरंग आप्पा, पंकजा मुंडे यांना पाडून आले.

हे भास्कर भगरे, भारती पवार यांना पाडून आले, तर हे कल्याण काळे रावसाहेब दानवे यांना पाडून आले आणि मी निलेश लंके विखेंना पाडून आलो, असे म्हटले. निलेश लंके यांच्या या वक्तव्यानंतर सभेत एकच हशा पिकला होता.

- Advertisment -

Most Popular

error: Content is protected !!