नेवासा
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील श्री.मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे जिजामाता शास्त्र व कला महाविद्यालयाचे वतीने लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांच्या जयंतीनिमित्त दि.१२ व १३ सप्टेंबर २०२५ रोजी “लोकनेते मारुतरावजी घुले पाटील राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन वक्तृत्व स्पर्धेचे” आयोजन करण्यात आल्याची माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिरीष लांडगे व स्पर्धा संयोजन समितीचे प्रा.डॉ.अशोक सागडे यांनी दिली.
या स्पर्धेसाठी
१) ‘दुरिताचे तिमिर जावो । विश्व स्वधर्म सूर्ये पाहो। जो जे वांछील तो ते लाहो। प्राणिजात॥
२) लोकनेते मारुतरावजी घुले पाटील यांचे सहकार, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातील योगदान,
३) कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि
४) बहुकार्यक्षमता (मल्टीटास्किंग):आधुनिक जीवनाची गरज’ हे चार विषय देण्यात आलेले आहेत.
स्पर्धेसाठी प्रथम क्रमांकास ११ हजार रुपये,द्वितीय क्रमांकास ७ हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी ५ हजार रुपये तसेच उत्तेजनार्थ दोन स्पर्धकास प्रत्येकि १ हजार रुपये रोख आणि स्मृतीचिन्ह वप्रमाणपत्र पारितोषिक स्वरुपात देण्यात येणार आहे.
स्पर्धा परिपत्रक व माहितीसाठी पुढील स्पर्धा समन्वयक प्रा.डॉ. मोहिनी साठे (मो.नं. ७०५७०६५४४५), प्रा.मीना पोकळे (मो.नं ९४२३७६६३३४) व प्रा. डॉ. रोहन नवले (मो.नं ९७६७०७३३००) यांच्याशी संपर्क साधावा. जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घ्यावा, असे अवाहन ही संयोजन समितीमार्फत करण्यात आले आहे.