नेवासा
नेवासा पंचायत समितीचे सहायक गटविकास अधिकारी सुरेश पाटेकर हे ३३ वर्षाच्या प्रदीर्घ सेवेनंतर ३१ऑगस्ट २०२५ रोजी सेवानिवृत्त होत आहेत.
त्यानिमित्त उद्या रविवार दि.३१ रोजी सकाळी १० वाजता श्रीक्षेत्र देवगड येथे सेवापुर्ती कृतज्ञता समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे.
श्री.पाटेकर यांनी जवखेडे खालसा ता. पाथर्डी येथे शिक्षक म्हणून तसेच आरोग्य सेवक म्हणून बाभळेश्वर, आखेगाव,ढोरजळगाव येथे सेवा केली. आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून खानापूर पंचायत समिती विटा जि. सांगली,राहुरी व शेवगाव येथे उल्लेखनीय काम केले. महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेचे जिल्हा सरचिटणीस व जिल्हाध्यक्ष म्हणून त्यांनी प्रभावीपणे काम केले तसेच अहिल्यानगर जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन म्हणून कामकाज करतांना त्यांनी सभासद कल्याणाच्या अनेक योजना राबवल्या.
आरोग्य सेवेतील कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र विकास सेवेत सहायक गट विकास अधिकारी पदावर पदोन्नतीच्या संधीचे पहिले मानकरी ठरले. पाटेकर यांनी पंचायत समिती नेवासा येथे सहायक गट विकास अधिकारी म्हणून कामकाज करताना पंचायत समिती नेवासा राहुरी व शेवगाव या ठिकाणी प्रशासक तथा गटविकास अधिकारी तसेच नेवासा येथे गटशिक्षणाधिकारी म्हणून कामकाज पाहिले. पंचायत समिती येवला येथे सहायक गट विकास अधिकारी म्हणून कामकाज करताना प्रशासक तथा गटविकास अधिकारी म्हणून कामकाज पाहिले. पाटेकर यांना अहिल्यानगर जिल्हा परिषदेचा आदर्श आरोग्य विस्तार अधिकारी म्हणून पुरस्काराने गौरविण्यात आले होते. पाटेकर उपक्रमशिल अधिकारी, उत्कृष्ट वक्ता, सुत्रसंचालक ,निवेदक व लेखक आहेत.